

नाशिक : म्हसरूळ येथील वैदुवाडीत राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेत जीवनप्रवास थांबवला. अनुष्का सुकलाल आठवले (रा. वैदुवाडी, म्हसरूळ) असे या मुलीचे नाव आहे.
अनुष्का ही लहानपणापासून मामाकडे शिक्षणासाठी राहत होती. तर तिचे आई-वडील (भुसावळ, जि. जळगाव) येथे राहतात. रविवारी (दि. १०) सायंकाळी ५.३० च्या सुमारास अनुष्काने घरातील स्टोव्हमध्ये असलेले डिझेल स्वत:च्या अंगावर ओतून पेटवून घेतले. यात ती १०० टक्के भाजली. मामा दीपेश भुकाणे यांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. म्हसरूळ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अनुष्का ही इयत्ता नववीत शिकत असून अभ्यासात हुशार हाेती. दरम्यान, तिला कुणाचा जाच हाेता का किंवा ती काेणत्या समस्येने ग्रस्त हाेती, याचा तपास पोलिस करीत आहेत.