इगतपुरी / घोटी : तालुक्यातील खेडभैरव येथील परदेशवाडी येथील समाधान आगविले या तरुणाचा खून करणार्या 9 संशयित आरोपींना 48 तासांत जेरबंद करण्यात घोटी पोलीसांना यश आले आहे.
पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी संशयित आरोपींना 48 तासांत जेरबंद केले.
ज्ञानेेशर नामदेव सप्रे, हेंत भास्कर सप्रे, (रा. शिरसाठे, इगतपुरी), विकास भगवान शिंदे, शंकर सोनाथ पाडेकर, प्रवीण गौतम धोंगडे (सर्व रा. वाळुंजे, ता. त्र्यंबकेेशर), संदीप काशीनाथ गोहिरे, सोमनाथ काशीनाथ गिरे (रा. रायगडनगर, नाशिक), रवींद्र त्र्यंबक आहेर (रा. शिरसाठे, इगतपुरी), नवनाथ आगिवले (रा. परदेशवाडी, इगतपुरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
गुन्ह्यात वापरलेली मारुती इको (एमएच 17, बीव्ही 5524) कार पोलिसांनी जप्त केली. दि. 22 ऑक्टोबर रोजी इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव येथील परदेशवाडी येथे मध्यरात्रीच्या सुारास समाधान आगविले (21) या तरुणाचा खून करण्यात आला होता. याबाबत मृताच्या वडिलांनी घोटी पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकर्यांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. आरोपींनी कुठलाही पुरावा सोडला नसल्याने त्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. मात्र पोलिस नरीक्षक विनोद पाटील यांनी या घटनेचा समांतर तपास करून गुप्त माहितीच्या आधारे व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत 9 संशयित आरोपींना जेरबंद करण्यात आले. पोलिस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक प्रवीण उदे, अजय कौटे, पोलिस हवालदार सतीश शेलार, गुरुदेव मोरे, प्रसाद दराडे, संतोष नागरे, योगेश यंदे, सतीश चव्हाण, केशव बस्ते, गौरव सोनवणे, नीलेश साळवे, मारुती बोर्हाडे आदींच्या पोलिस पथकाने ही कामगिरी केली.
तरुणाच्या खुनाची घटना पूर्ववैमनास्यातून घडली असून, घटनेच्या दिवशी संशयितांनी पार्टी करुन समाधान आगविले यास घटनास्थळी बोलावून घेतले होते. त्यानंतर घातक शस्त्राने डोक्यावर वार करून खून केला. विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी ज्ञानेेशर सप्रे व मयत समाधान यांचे शाळेत शिकत असल्यापासून वैर होते, अशी माहिती पुढे आल्याचे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी सांगितले.