

नंदुरबार : तक्रार दिल्याचा राग आल्याने संतापाच्या भरात घरात घुसून तक्रार देणाऱ्याची बरमुडा उतरवून त्याच्या गुप्तांगावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात घडली.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार धडगाव तालुक्यातील माकड कुंड येथे काही दिवसांपूर्वी आमशा मन्सी वळवी (माकडकुंड, पाडावपाडा ता. धडगाव) याने आपल्या शेतातील सुमारे 42 झाडांची कत्तल केली. त्याविषयी इंदया फेंदया (पाडवी वय- ५८ रा. माकडकुंड पाडावपाडा ता. धडगाव) याने संबंधित अधिकाऱ्यांकडे आमशा वळवीच्या विरोधात तक्रार दिली होती. यावरून आमशाच्या मनात इंद्या पाडवी याच्याबद्दल राग होता. या रागाच्या भरात मंगळवार (दि.20 एप्रिल) रोजी आमशा हा इंद्या याच्या घरात घुसला आणि शिवीगाळ करीत वाद घातला. यादरम्यान त्याने इंद्या पाडवीची बर्मुडा काढली आणि त्याच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. अशी फिर्याद धडगाव पोलीस ठाण्यात पाडवी यांनी दाखल केल्यानंतर गुरुवार (दि. 1 मे) रोजी आमशा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.