

ठाणे : ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद नगर परिसरात सहा महिन्यापूर्वी राहण्यास आलेल्या पाच मित्रांचे मोबाईल अज्ञात चोरट्याने घेऊन पोबारा केल्याची घटना समोर आलेली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ठाण्याच्या आझाद नगर येथे सहा महिन्यांपूर्वीच तक्रारदार वारीसअली मोहम्मद उमर सिद्धिकी आणि त्याचे मित्र राहण्यासाठी आले होते. ते सर्वजण मुंबईत ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवसभर कामावर जाऊन सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रूमवर आले होते. जेवण तयार करून सर्वजण जेवून रात्री १२ वाजण्याच्या सुमारास झोपी ही गेले. झोपण्यापूर्वी रूमवर खालुन लोखंडी शिडी लगत असलेल्या जाळीच्या दरवाज्याला कुलुप लावले होते. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते एक एक करुन कामाला जाण्यासाठी उठले. त्यानंतर रूममध्ये आजुबाजुला ठेवलेले मोबाईल फोन व पाकिट मिळून आले नाही. म्हणून रूम मध्ये शोध घेतला, तरी सुद्धा त्या ते मिळुन आले नसल्याने रुमच्या बाहेर जाऊन पाहिल्यावर रूमवर खालुन लोखंडी शिडीवरून वर येण्यासाठी जाळीच्या दरवाजाला लावलेले कुलुप तुटलेले दिसुन आले. यावरून चोरट्याने पाच मोबाईल फोन चोरी करून नेले. मात्र कंपनीत महत्वाचे काम असल्यामुळे ते सर्वजण कामावर गेल्यामुळे तक्रार देण्यास उशीर झाला. तसेच घटनेत चोरीला गेलेल्या ५ मोबाईल फोनची किंमत ७५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.