Malad Firing : पूर्ववैमनस्यातून मालाडमध्ये गोळीबार; तरुण जखमी

पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेने प्रचंड तणावाचे वातावरण
firing news /
 Crime news
Malad Firing : पूर्ववैमनस्यातून मालाडमध्ये गोळीबार; तरुण जखमीPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : नवरात्रोत्सवानिमित्त शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त असताना रविवारी सकाळी मालाड येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेने प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गोळीबारात अबतुलाह बेग हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जे. जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अबतुलाह बेग हा मालाड येथे राहतो. रविवारी (दि.21) सकाळी तो त्याच्या मित्रांसोबत संजयनगर, बैद कंपाऊंडजवळ बसला होता. याच दरम्यान तिथे आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता. त्यातील एक गोळी बेगच्या जबड्याला लागली होती. त्यात तो जखमी झाला होता. गोळीबारानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. जखमी झालेल्या बेगला त्याच्या मित्रांनी आधी एका खासगी आणि नंतर जे. जे. रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती सुधारत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबाराची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

firing news /
 Crime news
Arthur Road Jail Mumbai : आर्थर रोड जेलमध्ये दोन कैद्यांमध्ये हाणामारी

याप्रकरणी बेगची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून या जबानीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गोळीबार कोणी केला, त्याचा टार्गेट बेग होता की अन्य कोण होता, गोळीबारामागील कारण काय याचा खुलासा होऊ शकला नाही.

पूर्ववैमनस्नातून हा गोळीबार झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरून पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news