Latur Crime : कलाकेंद्रासमोर दोन गटांमध्ये हाणामारी, येरमाळ्यात गुन्हे दाखल
धाराशिव (लातूर) : कळंब तालुक्यातील चोराखळी येथे महा काली कला केंद्रासमोर दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी नऊ जणांसह इतर दहा अज्ञात व्यक्तींवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेत पाच जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पहिला गुन्हाः तौसीफ सिकंदर तांबोळी (रा. सांजा, धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पवन पौळ (रा. आळणी), अक्षय साळुंके, राज पवार, विजय साळुंके (तिघे रा. धाराशिव) आणि इतर चार पाच अनोळखी व्यक्तींनी महाकाली कला केंद्रासमोर जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली.
यावेळी फरशीचे तुकडे, लाकडी दांडके आणि दगडांनी डोक्यावर, पाठीवर, पोटावर आणि हातावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. दुसरा गुन्हाः विजय गोपीनाथ साळुंके (रा. गणेश नगर, धाराशिव) यांच्या फिर्यादीनुसार, संदीप यल्लप्पा भुट्टे, रोहित जाधव (रा. धाराशिव), तौफीक सिकंदर तांबोळी (रा. सांजा रोड, धाराशिव) आणि इतर पाच अनोळखी व्यक्तींनी दगडाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तसेच, इतर सात जणांनी मिळून शिवीगाळ करत फिर्यादी आणि त्यांच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या हाणामारीत अक्षय साळुंके, विजय गोपीनाथ साळुंखे, तोसिफ तांबोळी, संदीप यल्लप्पा भुट्टे आणि रोहित जाधव असे पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना धाराशिव येथील खासगी व शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल भोजगुडे करत आहेत.
गोळीबाराचा पोलिसांकडून इन्कार
दरम्यान या गुन्ह्यात आरोपीने गोळीबार केला. त्यात एकजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्रत्यक्षात मात्र हे वृत्त चकीचे असल्याचे येरमाळा पोलिसांनी सांगितले,

