Kidnapping Girl Manmad : बालिका अपहरण प्रयत्नातील संशयिताला चोप

Nashik Crime News : महिनाभरातील दुसरी घटना : नागरिकांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीची सुटका
मनमाड (नाशिक)
मनमाड : याच उपजिल्हा रुग्णालय आवारातून मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. इन्सेटमध्ये संशयित जय वैराळेPudhari News Network
Published on
Updated on

मनमाड (नाशिक) : शहराच्या सिकंदर भागातील बालिकेच्या अपहरण प्रयत्नाची घटना ताजी असतानाच, गुरुवारी (दि. १७) उपजिल्हा रुग्णालयात आणखी एक अपहरणनाट्य घडले.

Summary

लसीकरणासाठी रुग्णालयात आलेल्या महिलेच्या तीनवर्षीय चिमुकलीला पळविण्याचा प्रयत्न तरुणाने केला. सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा डाव फसला. नागरिकांनी संशयिताला चोप देत नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर परिषदेतील सफाई कर्मचारी प्रवीण निकाळे यांची पत्नी छाया या नऊ महिन्यांच्या मुलाला नियमित लस देण्यासाठी उपजिल्हा रुगणालयात गेल्या होत्या. सोबत त्यांची आई आणि तीन वर्षांची मुलगीदेखील होती. खेळता खेळता चिमुकली रुग्णालयाबाहेर आली, तेव्हा एका तरुणाने तिला उचलून नेले. त्यामुळे रडायला लागलेल्या मुलीला पाहून आजूबाजूच्या लोकांना संशय आला. त्यांनी त्या तरुणाची विचारपूस केली. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तेवढ्यात मुलीच्या शोधातील आई तेथे आली. छाया यांनी हाक मारताच मुलीने आईकडे धाव घेतली. एव्हाना त्या तरुणाची भंबेरी उडाली. हा अपहरणाचा प्रकार असल्याच्या संशयावरून संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. त्याने जय पुरुषोत्तम वैराळे (रा. शिवर, जि. अकोला) असा परिचय दिला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, सखोल चौकशी केली जात असल्याचे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी सांगितले.

Nashik Latest News

मनमाड (नाशिक)
Doctor Kidnapping | डॉक्टराचे अपहरण करून प्राणघातक हल्ला

प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याची गरज

सिकंदरनगर परिसरात अलीकडे पाचवर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता. नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन्ही मुली सुखरूप वाचल्या. गुरुवारी झालेल्या प्रकारात जमावाने जाब विचारला असता, संशयिताने 'लहान मुलगी आणून दिल्यास १० लाख रुपये देऊ' असे एकाने सांगितल्याचा दावा केला. हे प्रकरण अपहरणाच्या मोठ्या साखळीशी जोडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकांनी अधिक सावध राहण्याचे आणि पोलिसांनी या प्रकरणाचा मूळ छडा लावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news