Crime News
लाच घेताना दोन शिक्षक अटकेतFile News

Jalgaon | अकरावीच्या प्रवेशासाठी लाच घेताना दोन शिक्षक अटकेत

धुळे | गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयातील प्रकार
Published on

मेहुणबारे ( जळगाव ) : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात अकरावीच्या प्रवेशासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना दोन शिक्षकांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हा मेहुणबारे येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा गिरणा विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाला होता. पुढील शिक्षणासाठी त्याला त्याच शाळेत सायन्स शाखेत अकरावीला प्रवेश घ्यायचा होता. 27 तारखेला तक्रारदाराने शाळेतील शिक्षक गुलाब वीरभान साळुंखे आणि लिपिक पंजाबराव देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी प्रवेशासाठी एकूण 20 हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यातील 10 हजार रुपये ऑनलाइन अर्ज करताना, उर्वरित 10 हजार रुपये प्रवेश घेतल्यावर देण्याचे सांगण्यात आले.

या प्रकाराची तक्रार तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. सापळा रचून गुलाब साळुंखे हे लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. त्यानंतर लिपिक उल्हास बागुल यालाही अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजन कदम आणि संतोष पावरा यांनी ही कारवाई केली. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया अडथळ्यांनी त्रस्त असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news