Jalgaon Police : पोलीसांच्या नाकावर टिच्चून गुरे चोरी करणारे आरोपी बेड्यांसह फरार

अमळनेर तालुक्यातील कुऱ्हेजवळ घटना
Accused
गुरे चोरी करणारे आरोपी बेड्यांसह फरारFile Photo
Published on
Updated on

जळगाव : अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे परिसरात दोन संशयित आरोपी पोलिसांच्या वाहनातून बेड्यांसह फरार झाल्याची घटना बुधवार ( दि. 22 ) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

अमळनेर तालुक्यातील लोणे आणि पिंपळे गावांमधून सात गुरे चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरीलाल पाटील आणि राहुल कोळी हे करत होते. तपासादरम्यान जवखेडे येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एमएच-१९ बीबी ५१९८ या क्रमांकाची दुचाकी चोरीच्या ठिकाणी दिसून आली.

दुचाकीच्या मालकाचा शोध घेतल्यावर अकील कादिर पिंजारी (रा. आझाद नगर, पिंप्राळा, जळगाव) असे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला बुधवार ( दि. 22 ) रोजी दुपारी दोन वाजता ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान अकील पिंजारी याने त्याचे साथीदार शाकीर शाह, अरमान शाह (वय ३०, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), अमजद शेख फकीर कुरेशी (वय ३५, रा. अशोक किराणा जवळ, मेहरूण), आफताब आलम शेख रहीम (रा. नशिराबाद) आणि तौसिफ शेख नबी (रा. फातिमा नगर, जळगाव) यांची नावे सहआरोपी असल्याचे सांगितले आहे.

या टोळीने अमळनेर तालुक्यात सात आणि पहुर परिसरात तीन गुरे चोरी केल्याची कबुली दिली. चोरीसाठी त्यांनी पिकअप वाहन (एमएच-१९ सीव्ही-७१६९) वापरल्याचेही उघड झाले. त्यापैकी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर तौसिफ शेख नबी हा पसार होता.

Accused
Jalgaon Crime : दोन गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसांसह दोन आरोपी अटकेत

रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार

रात्री स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी आरोपींना शासकीय वाहनाने अमळनेर येथे आणत असताना, शाकीर शाह, अरमान शाह आणि अमजद शेख, फकीर कुरेशी या दोघांना बेड्या घालून मागच्या सीटवर बसवले होते. मात्र पोलीसांचे वाहन कुऱ्हे रेल्वे अंडरपासजवळ पोहोचल्यावर दोघांनी संधी साधून पळ काढला.

पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली, मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत शेतात लपल्याने त्यांचा शोध अद्यापही लागलेला नाही. उर्वरित दोन आरोपींना अमळनेर पोलिस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले आहे. फरार झालेल्या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news