

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव मधील शिवरामनगर येथील घरात चोरी झाल्याची घटना सोमवार (दि.27) रोजी झाली आहे. परंतु नेमकी किती मुद्देमाल चोरी गेला याचा तपास अद्याप लागलेला नाही. मुक्ताईनगर येथे राहत असल्याने जळगाव येथील घराला कुलूप लावले होते. त्यामुळे जळगाव येथील पहिल्या मजला आणि तळ मजला येथे चोरी झाली आहे. रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरही काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. त्यामुळे कायदा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.