

जळगाव : चोपडा शहरातील एका पाच वर्षीय आदिवासी मुलीवर मध्यप्रदेशातील 22 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याने शहरभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मध्यप्रदेशातील आरोपी मयाल गिरदार वास्कले (वय 22, रा. पिपऱ्यापानी ग्रामपंचायत, चिलऱ्या ता. वरला, मध्यप्रदेश) याने चोपडा गोरगावले रस्त्यावरील एका झोपडीमध्ये पाच वर्षीय मुलीला कुरकुरे घेऊन देतो या बहाण्याने नेत तिच्यावर अतीप्रसंग केला. मुलीने आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तात्काळ झोपडीकडे धाव घेतली. नागरिकांपैकी यश चौधरी याने पोलीसांना याबाबत माहिती दिली. शहर पोलीसांनी घटनास्थळी हजर होत पीडीत मुलीसह संशयित आरोपीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. तृप्ती पाटील यांनी पिडीतेवर तात्काळ उपचार सुरु केले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पोलिस अधिकारी मधुकर सावळे, एकनाथ भिसे, जितेन्द्र वल्टे, पो.कॉ. संतोष पारधी यांनी गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशीरापर्यंत केले.