

चोपडा (जळगाव ) : चोपडा तालुक्यातील वाडी गावातून गांजाची चोरटी विक्री करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला अडावद पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे १ लाख ४ हजार रुपयांचा ५ किलो ओला गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (२८ जून) सायंकाळी सात वाजता वाडी गावात छापा टाकून सुनिल उर्फ तिसमाऱ्या जगन बारेला (रा. वाडी, ता. चोपडा) याला अटक करण्यात आली. तो गांजाची अवैध विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी पोलीस नाईक संजय धनगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत.