Jalgaon Crime News | मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री

जळगाव । चार महिलांची मुक्तता
Crime - Prostitution under the name of massage center
मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री File Photo
Published on
Updated on

जळगाव : शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळील नयनतारा मार्केट मॉल याठिकाणी असलेल्या मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर एलसीबी सह जळगाव शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आली आहे.

तब्बल पाच सेंटरमार्फत देहविक्री व्यवसाय सुरू

शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या व महत्त्वाच्या चौकात असलेल्या गोविंद रिक्षा स्टॉप जवळील आर्किड मॉल येथे दुकान नंबर 408 या ठिकाणी मसाज पार्लर च्या नावाखाली देहविक्रीचे व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली या माहितीच्या आधारे एलसीबी व शहर पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांनी या मसाज पार्लरवर छापा बनावट ग्राहकाच्या मदतीने टाकला. या मसाज पार्लरमध्ये संशयित राजू मधुजी जाट (राहणार कलोधिया तालुका पिंपरी, जिल्हा भीलवाडा राजस्थान) याने पोलिसांच्या बनावट ग्राहकाला मसाज व्यतिरिक्त इतर सेवा देण्यासाठी आमिष दिल्यावर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईमध्ये चार महिलांमार्फत पाच सेंटरच्या देहविक्री व्यवसाय सुरू असल्याचे आढळले. त्यांचा मालक संशयित विक्रम राजपाल चदमारी धानी (वय 20, रा, चत्तरगढ पत्ती जिल्हा सिरसा हरियाणा) हा व्यवसायाला प्रोत्साहन देत होता. या दोघांविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅनेजर राजू जाट याला अटक करण्यात आली असून महिलांना मुक्त करुन त्यांना महिला वस्तीगृहामध्ये पाठवण्यात आले आहे.

या कारवाईत शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी, पुणे शीतलकुमार नाईक स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शरद बागल, उपनिरीक्षक महेश घायतळ, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, सुनील पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, योगेश पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली महाजन, प्रियंका कोळी, मंगला तायडे, चालक दीपक चौधरी यांच्या पथकाने कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news