

जळगाव : भुसावळ शहरातील नॉर्थ कॉलनी परिसरातील तरुणाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी (१० जून) उघडकीस आली. याप्रकरणी रात्री ८ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन चंद्रमणी शिंदे (वय २५, रा. नॉर्थ कॉलनी, भुसावळ) हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्याला आहेत. मंगळवारी दुपारी १२ ते १.३० वाजेच्या दरम्यान त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले.
चोरीचा प्रकार लक्षात येताच चेतन शिंदे यांनी तत्काळ भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.