Jalgaon Bribe News : मुख्याध्यापिकेने प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी घेतली लाच

प्रसूती रजेसाठी मागितली 36 हजारांची लाच; खळबळजनक प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ
Chhatrapati Sambhajinagar Bribe case
Brib Case : प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी घेतली लाचPudhari File Photo
Published on
Updated on

जळगाव : रावेर तालुक्यातील खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळ संचालित धनाजी नाना विद्यालयात कार्यरत असलेल्या महिला उपशिक्षिकेची प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी ३६ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून या प्रकारामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या सुनेची नियुक्ती खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयात उपशिक्षिका पदावर आहे. २ जून रोजी तिने वैद्यकीय प्रमाणपत्रासह मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन (वय ५७) यांच्याकडे प्रसूती रजेसाठी अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदाराने मुख्याध्यापिकांची भेट घेऊन रजेबाबत विचारणा केली असता, त्यांनी प्रति महिना ६ हजार रुपये या हिशोबाने सहा महिन्यांसाठी एकूण ३६,००० रुपये लाचेची मागणी केली होती.

Chhatrapati Sambhajinagar Bribe case
Jalgaon Crime : गावठी कट्टा प्रकरणातील फरार आरोपी एलसीबीच्या जाळ्यात जेरबंद

तक्रारदाराने ७ जुलै रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणीही त्याच दिवशी पंचासमक्ष करण्यात आली. त्यानंतर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांच्या नेतृत्वात सापळा रचण्यात आला.

त्यानुसार, मुख्याध्यापिका मनीषा महाजन यांनी तक्रारदाराकडून ३६,००० रुपये स्वीकारून कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (वय २७) यांना ते मोजण्यास दिले. यादरम्यान दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले.

या प्रकरणी मुख्याध्यापिका मनीषा महाजन व कनिष्ठ लिपिक आशिष पाटील यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सावदा पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news