

नाशिक : 'मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तू खूप आवडते' असे बोलून अंगलट करण्याचा प्रयत्न करीत विनयभंग करणाऱ्या संशयित राजेश ताजनपुरे (रा. चेहेडी पंपीग, नाशिक रोड) व अन्य अज्ञात इसमाविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि.१८) दुपारी १ वाजेच्या सुमारास, संशयित राजेश ताजनपुरे व त्याच्यासोबत अन्य एक व्यक्ती फिर्यादीच्या घरी आला. 'मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तु खूप आवडते’ असे बोलून फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच रागातून फिर्यादीच्या घराच्या दरवाज्यासमोर बसला. शिविगाळ करून फिर्यादीला हाताचापटांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या भावास बघून घेईल, अशी धमकी दिली. पोलिस तपास करीत आहेत.