Hi-tech communication of prisoners | महाराष्ट्रातील बंद्यांचा आप्तेष्टांशी हायटेक संवाद

पुढारी विशेष! देशातील कारागृहांमध्ये 'व्हीसी' वापरात राज्य अव्वल; 20 मिनिटे भावनिक संवाद
Video conferencing
कारागृहांमधील बंद्यांना भेटण्यासाठी प्रशासनाने 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग' (Video conferencing) सुविधा उपलब्ध करून दिली आहे.Pudhari News network
Published on
Updated on

नाशिक : गौरव अहिरे

कारागृहांमधील बंद्यांना भेटण्यासाठी प्रशासनाने 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग' (Video conferencing) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार देशात सर्वाधिक व्हीसीद्वारे बंद्यांसोबत संवाद महाराष्ट्रात साधण्यात आला आहे. 1 जानेवारी ते 11 नोव्हेंबर या कालावधीत देशभरात 63 लाख 84 हजार 132 नातलग, मित्रपरिवार किंवा वकिलांनी कारागृहांमधील बंद्यांची भेट घेत संवाद साधला आहे. त्यापैकी देशात 3 लाख 38 हजार 364 जणांनी व्हीसीद्वारे भेट घेतली, तर महाराष्ट्रात सर्वाधिक 1 लाख 20 हजार 363 वेळा बंद्यांसोबत व्हीसीद्वारे संवाद साधला आहे. (Hi-tech communication of prisoners in Maharashtra with their relatives)

देशभरात सुमारे 941 विविध कारागृहे आहेत. या कारागृहांमध्ये लाखो शिक्षाबंदी व न्यायाधीश बंदी आहेत. या बंदींची कारागृहात भेट घेण्यासाठी नियमावली असून, प्रत्यक्ष भेट घेण्यावर आजही नातलग, मित्रपरिवार व वकिलांचा भर असतो. त्यात आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही बंद्यांना भेटता येणे शक्य झाले आहे.

त्यानुसार देशातील 36 पैकी 14 राज्यांमधील कारागृहांमध्ये व्हीसीची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे घरबसल्या नागरिक, मित्रांना कारागृहातील बंद्यांशी संवाद साधता येत असतो. त्यासाठी ऑनलाइन नावनोंदणी करावी लागत असून, व्हीसीची लिंक तयार करणे, ती कारागृह प्रशासनास पाठवणे, कागदपत्रांची खात्री झाल्यानंतर ठराविक वेळेत बंद्यांसोबत संवाद साधता येत असतो. त्यानुसार 3 लाख 38 हजार 364 जणांनी व्हीसीद्वारे बंद्यांसोबत संवाद साधला आहे.

  • राज्यातील 9 मध्यवर्ती, 31 जिल्हा, 19 खुली, 1 खुली वसाहत आणि 172 दुय्यम कारागृहांमध्ये असलेल्या बंद्यांसोबत 1 लाख 20 हजार 363 जणांनी व्हीसीद्वारे संवाद साधला आहे.

  • देशात सर्वाधिक व्हीसीमार्फत बंदींसोबत संवाद साधणारे राज्य म्हणून महाराष्ट्र अव्वल ठरले आहे.

  • खालोखाल दिल्ली येथे 63 हजार 159, बिहार राज्यात 43 हजार 628 जणांनी बंद्यांसोबत व्हीसीद्वारे संवाद साधला आहे.

  • गुजरात, राजस्थान, ओडिशा, मध्य प्रदेश राज्यांमध्ये प्रत्येकी 12 हजारांहून अधिक वेळा बंद्यांसोबत व्हीसीद्वारे त्यांच्या आप्तेष्टांनी संवाद साधला आहे.

देशात किती कारागृहे

  • मध्यवर्ती कारागृहे १२१

  • विशेष कारागृहे ०२

  • जिल्हा कारागृहे ३७१

  • दुय्यम कारागृहे ३६९

  • महिला कारागृहे १८

  • खुले कारागृहे ५५

  • किशोर सुधारालय ०५

देशात असा साधला बंद्यांसोबत संवाद (कंसात राज्यातील आकडेवारी)

  • व्हिडिओ कॉन्फरन्सिंग - 3,38,364 (1,20,363 )

  • ऑनलाइन नावनोंदणी करून प्रत्यक्ष भेट - 6,89,343 (17,475)

  • प्रत्यक्ष भेट -53 लाख 56 हजार 425 (4,43,816)

  • एकूण भेटी - 63,84,132 (5,81,654)

बंद्यांसोबत नातलग, मित्रपरिवारांना संवाद साधण्यासाठी व्हीसी सुविधा कारागृहात उपलब्ध आहे. ज्यांना संवाद साधायचा असतो त्यांची कागदपत्रे पडताळणी करून शहानिशा केली जाते. तसेच संमती मिळाल्यानंतर बंदीसोबत 20 मिनिटे संवाद साधता येतो. अंडरट्रायल बंदीसोबत आठवड्यातून एकदा, तर शिक्षाबंदीसोबत महिन्यातून दोनदा संवाद साधता येतो. मात्र, पाकिस्तानमधील आरोपी असल्यास त्या बंदीसोबत संवाद साधता येत नाही.

अरुणा मुगुटराव, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह, अधीक्षक, नाशिक.

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह राज्यात सहावे

व्हीसीद्वारे बंद्यांसोबत संपर्क साधण्यात राज्यात तळोजा मध्यवर्ती कारागृह अव्वल ठरले असून, चालू वर्षात 18 हजार 366 वेळा बंद्यांसोबत संवाद साधण्यात आला. त्या खालोखाल येरवडा मध्यवर्ती कारागृहात 14 हजार 726, तर ठाणे मध्यवर्ती कारागृहात 14 हजार 182 वेळा बंद्यांसोबत व्हीसीद्वारे संवाद साधला आहे. तसेच सहाव्या क्रमांकावर नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह असून, तेथे 10 हजार 53 वेळा बंद्यांसोबत व्हीसीवरून संवाद साधण्यात आला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news