प्रातिनिधिक छायाचित्र (File Photo)
क्राईम डायरी
Gutkha Seized : जळगावमध्ये 16 लाखांचा गुटखा जप्त
16 लाख 55 हजार 820 रुपयांचा गुटखा आणि चारचाकी पोलीसांकडून जप्त
जळगाव : शहरातील टीव्हीएस शोरूमजवळील कोंबडी बाजार परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 16 लाख 55 हजार 820 रुपयांचा गुटखा आणि चारचाकी जप्त करण्यात आली आहे.
शुक्रवार (दि.29) रोजी सायंकाळी पांढऱ्या रंगाची बोलेरे वाहनात प्रतिबंधित गुटखा घेऊन शहरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी छापा टाकून वाहन ताब्यात घेतले. यामध्ये 12 लाख 55 हजार 820 रुपयांचा प्रतिबंधित असलेला गुटखा आणि चार लाख रुपये किमतीचे वाहन असे एकूण 16 लाख 55 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पप्पू कुमार शिवकुमार सहनी (वय 27, रा. बिहार) आणि वाहनचालक सुरेश कुमार कुंदन सहनी (रा. नशिराबाद) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

