

मिरा रोड ( ठाणे ) : काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत फिल्म इन्डस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या वेश्यादलाल महिलेला अत्याचार प्रतिबंधक व वि.बा.सं.व काळजी कक्ष या पथकाने अटक केली आहे. तिच्या ताब्यातुन टि.व्हि. सिरीयल व बांगला सिनेमा मध्ये काम करणाऱ्या दोन पिडित मुलींची सुटका करण्यात आली आहे.
ही महिला फिल्म ॲक्टर असून ती वेश्याव्यवसाय करत असून तिच्या मोबाईलवर पुरुष गि-हाईकांने संपर्क केल्या नंतर ती टि.व्हि सिरीयल व बांगला सिनेमा मध्ये काम करणाऱ्या मुलींना वेश्यागमनासाठी मुली पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एक बोगस गिऱ्हाईक तयार करून वेश्यादलाल हिने सांगितल्याप्रमाणे ठाकुर मॉल समोर, काशिमिरा या ठिकाणी पाठवून सत्यता पडताळली. त्यानंतर छापा टाकला असता महिला वेश्यादलाल हिने टि. व्हि सिरीयल व बांगला सिनेमामध्ये काम करणाऱ्या दोन पिडीत मुलीना वेश्यागनमासाठी प्रवृत्त करुन पैसे घेताना तिला ताब्यात घेण्यात आले.
तिच्या ताब्यातून दोन पिडित मुलीची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. महिला वेश्यादलाल हिच्या विरूध्द पोउपनिरी अनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार भारतीय न्याय संहीताचे कलमासह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्या प्रमाणे काशीमीरा पोलीस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.