DP Scam | डीपी स्कॅम

एका खासगी कंपनीतील लेखापालाला रात्री अनोळखी नंबरवरून व्हॉटस्अ‍ॅप संदेश आला.
DP Scam
डीपी स्कॅम(Pudhari File Photo)
Published on
Updated on
Summary

‘हॅलो, अर्जंट काम आहे. लगेच पैसे ट्रान्सफर करा!’ एवढाच एक संदेश आणि एका क्लिकमध्ये लाखो रुपये खात्यातून गायब! आजच्या डिजिटल युगात ‘प्रोफाईल पिक्चर’ म्हणजे केवळ ओळख नाही, तर विश्वासाचे साधन ठरले आहे. पण याच फोटोचा वापर करून सायबर चोरटी लाखो रुपयांचा गंडा घालत आहेत.

आशीष शिंदे, कोल्हापूर

एका खासगी कंपनीतील लेखापालाला रात्री अनोळखी नंबरवरून व्हॉटस्अ‍ॅप संदेश आला. डीपीवर कंपनीच्या वरिष्ठाचा फोटो होता. संदेश छोटाच, पण तातडीचा होता. हा माझा प्रायव्हेट नंबर आहे, मी मिटिंगमध्ये आहे, लगेच 50 हजार या नंबरवर ट्रान्सफर कर. विश्वास बसायला एवढेच पुरेसे होते. लेखापालाने क्षणाचा विलंब न करता पैसे पाठवले. सकाळी खर्‍या वरिष्ठांशी बोलल्यावर धक्काच बसला. असा कोणताही मेसेज त्यांनी पाठवला नव्हता.

अगदी अशीच दुसरी घटना औद्योगिक क्षेत्रातील एका अधिकार्‍याबाबत घडली. त्याच्या नावाने बनवलेले फेक प्रोफाईल, त्यावर व्यावसायिक फोटो आणि औपचारिक भाषा. हा माझा खास नंबर आहे, गोपनीय आहे, असे सांगत पुरवठादारांकडून तातडीचे व्यवहार मागवले गेले. काही तासांत कोटींची रक्कम गायब झाली आणि खरी व्यक्ती समोर आली तेव्हा उशीर झालेला होता.

डीपी स्कॅम ही ऑनलाईन फसवणुकीची एक पद्धत आहे. सायबर चोरटी आधी सोशल मीडियावरून माहिती गोळा करतात. सार्वजनिक फोटो, लिंक्डइनवरील तपशील किंवा जुन्या बातम्या वापरून प्रोफाईल तयार करतात. त्यावर खर्‍या व्यक्तीचा फोटो लावतात आणि नंबर बदलून बनावट खाते तयार करतात. नंतर अचानक दबाव आणणारे मेसेज पाठवतात. मिटिंगमध्ये आहे, गोपनीय व्यवहार आहे, आत्ता लगेच करा अशा शब्दांनी समोरच्यावर प्रेशर निर्माण करतात. घाईगडबडीत पडताळणी न करता अनेकजण याला बळी पडतात.

DP Scam
Crime Diary Nashik | दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून दे दणादण....

यामुळे ऑनलाईन जगात फक्त ओळखीच्या फोटोवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. या प्रकारच्या डीपी स्कॅमपासून वाचण्यासाठी अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजवर कधीही डीपी पाहून विश्वास ठेवू नका. कितीही ओळखीचा चेहरा दिसला तरी मोठे आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी त्या व्यक्तीला त्याच्या मूळ नंबरवर फोन करून खात्री करा. गोपनीय किंवा तातडीचे सांगून दबाव टाकणार्‍या मेसेजला उत्तर देणे टाळा. कंपनी किंवा कुटुंबात नेहमी व्यवहारासाठी ठरलेली पडताळणी पद्धत (ड्युअल व्हेरिफिकेशन) वापरा. जर अशा प्रकारे गंडा घालण्याचा प्रयत्न झाला तर, लगेच बँक आणि लूलशीलीळाश.र्सेीं.ळप वर तक्रार करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news