पालघर (ठाणे)
चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी हट्ट केल्याने आईने तिच्या दोन मुलांना लाटण्याने बेदम मारहाण केली. Pudhari News Network

Chicken lollipop | चिकन लॉलीपॉपचा हट्ट : आईने लाटण्याने केली मारहाण; चिमुरडा गतप्राण

आईच्या मारहाणीमुळे सात वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू
Published on

पालघर (ठाणे) : चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी हट्ट केल्याने आईने तिच्या दोन मुलांना लाटण्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सात वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पालघर शहरानजीक काशीपाडा परिसरात घडली आहे. चिन्मय धुमडे असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पालघर शहरानजीक असलेल्या जुना सातपाटी रस्त्यावरील काशीपाडा येथे घोडेला कॉम्प्लेक्स, शाम रिजेन्सी नावाची इमारत आहे. या ठिकाणी पल्लवी धुमडे (वय ४०) ही महिला तिचा मुलगा चिन्मय (वय ७) आणि मुलगी लव्या (वय १०) या दोन मुलांसोबत तिच्या बहिणीच्या घरी राहत होती. पतीशी पटत नसल्याने काही महिन्यापूर्वी भाईंदर येथून पालघर शहरानजीकच्या काशीपाडा येथे राहण्यास आली होती.

शुक्रवारी (दि.26) रात्रीच्यावेळी चिन्मय आणि लव्या या दोन्ही मुलांनी आई पल्लवी हिच्याकडे चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी हट्ट धरला. नवरात्र सुरू असल्याने उपवास आहेत, त्यामुळे चिकन लॉलीपॉप मिळणार नाही, असे आईने दोनही मुलांना सांगितले. यावेळी दोन्ह मुलांनी चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी आईकडे हट्ट धरला.

मुलांनी हट्ट धरल्याने आई पल्लवीचे तिच्या रागावर नियंत्रण राहिले नाही आणि दोन्ही मुलांना तिने लाटण्याने मारहाण केली. यावेळी सात वर्षाच्या चिन्मय याच्या डोक्यात लाकडी लाटणी जोरात लागल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान सात वर्षाच्या चिन्मय याचा मृत्यू झाला आहे.

खुनाचा गुन्हा दाखल

याप्रकरणी आरोपी आई पल्लवी धुमडे हिच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आईला पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास पालघर पोलीस करीत असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news