

सिडको (नाशिक) : शहरात पुन्हा गुन्हेगारांनी डोके वर काढले असुन दोन ते तीन जणांनी कामटवाडे स्मशानभूमी भागात दगड व डोक्यात फरशी टाकून अल्पवयीन बालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
संत कबीरनगर येथे अल्पवयीन बालकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे, पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. जुने भांडणाच्या कारणावरून हा खून करण्यात आल्याची चर्चा असून संशयित आरोपींना लवकर ताब्यात घेतले जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.