

ठळक मुद्दे
तीन मुलींचे अपहरण होऊनही तपासाचा थांगपत्ता नाही; पोलिसांवरील विश्वास डळमळीत
कुटुंबियांचा टाहो ! आमच्या पोरींचा पत्ताच लागत नाही मग पोलिस आहेत तरी कशासाठी?
वरिष्ठांना कळवूनही ठोस कारवाई नाही
आष्टी ( बीड ) : अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा तपास अद्याप अंधारात असतानाच, आता तिसऱ्या मुलीचे अपहरण होऊन पोलिसांची थेट लाज काढणारी घटना घडली आहे.
पहिल्या दोन घटनांना दीड ते दोन महिने उलटूनही कसल्याच तपासाचा थांगपत्ता नाही. उलट पीडित पालकांचा पोलिसांवरील विश्वास पूर्णपणे डळमळीत झाला आहे. पीडित पंडित कुटुंबाची वेदना शब्दांत मावणार नाही. आमच्या पोरीच्या जिवाचे काही बरेवाईट झाले आहे का, ते तरी दाखवा एसपी साहेब ! अशी आर्त टाहो या कुटुंबीयांनी दिली आहे.
अंभोरा ठाण्याच्या हद्दीतील दोन गावांतून दोन वेगवेगळ्या मुलींचे अपहरण झाले. तपास काही लागत नसल्याने प्रकरणे स्वतंत्र पथकाकडे सोपवावी, असा नियम तपास लागत नाही, गुन्हेगार सापडत नाहीत, आमच्या पोरींचा पत्ताच लागत नाही मग पोलिस आहेत तरी कशासाठी? एसपी साहेब, आमच्या मुलीचं काही बरेवाईट झालं आहे का, ते तरी सांगा!
पंडित कुटुंब, पीडित पालक
असतानाही तसे झाले नाही. उलट गावकुसात चर्चा आहे की, पोलिसांनी 'चहापाणी' करूनच हे प्रकरण रेटून दिले. या ढिसाळ कारभाराच्या पार्श्वभूमीवर रविवारी (११ तारखेला) पुन्हा एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवला असला तरी, पालकांना त्यांच्या
मुलीचे भवितव्य काळोखात गेले आहे, याची भीती सतावत आहे. पहिल्या दोन घटनांचा तपास अडकवून ठेवणे, वरिष्ठांना कळवूनही ठोस कारवाई न करणे, आणि आता तिसरी घटना घडूनही पोलिसांकडून तातडीची हालचाल न दिसणे, या सर्वामुळे अंभोरा पोलिस ठाण्यावर नागरिकांचा विश्वास जवळपास संपलाच आहे.