सातारा : यवतेश्वर बंधाऱ्यामध्ये मुलगा बुडाला | पुढारी

सातारा : यवतेश्वर बंधाऱ्यामध्ये मुलगा बुडाला

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा – कास रस्त्यावरील यवतेश्वर येथे बंधाऱ्यामध्ये मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ऋषिकेश राजाराम कार्वे (वय १५, रा. यवतेश्वर ता. सातारा) असे त्याचे नाव आहे.

अधिक वाचा : फक्त १० सेकंदात मगरीकडून चित्त्याची अंगावर शहारा आणणारी शिकार! (video) 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, ही घटना काल (रविवार) सायंकाळी घडली आहे. ऋषिकेश मित्रांसोबत डोंगरावर फिरायला गेला होता. गेल्या आठ दिवसांमध्ये परिसरात पाऊस झाल्याने बंधाऱ्यामध्ये पाणी साठले होते. बंधाऱ्यामध्ये पोहण्यासाठी गेल्यानंतर तो बुडाला. त्याला मित्रांनी बाहेर काढले व तात्काळ उपचारासाठी सिव्हिल मध्ये दाखल केले. त्‍याच्यावर प्राथमिक उपचार केले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अधिक वाचा : पुणे : झोपेच्या गोळ्यांनी इंजिनिअर नवऱ्याला संपवले आणि कोरोनाचा केला बनाव पण पोलिसांनी…!

या घटनेची माहिती कार्वे कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, या घटनेची तालुका पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही.

Back to top button