

White Collar Jobs: पांढप पेशा नोकऱ्या करणाऱ्यांच्या भविष्यात काहीतरी मोठं होणार आहे. याबाबत सर्व देशातील सरकार तयार नाहीयेत असं वक्तव्य प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी दावोसमध्ये केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेमुळं अनेक नोकऱ्यांचे स्वरूप खूप वेगाने बदलणार आहे. त्यामुळे तयारीसाठी खूपच कमी वेळ राहिला आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बिल गेट्स यांनी खास मुलाखत दिली होती. त्यावेळी ते म्हणाले की, 'मी असं म्हणतोय की पुढच्या चार ते पाच वर्षात व्हाईट कॉलर आणि ब्लू कॉलर दोन्ही नोकऱ्यांबाबत मोठे बदल होणार आहेत. सरकारांना याचा सामना करण्यासाठी काहीतरी पावलं उचलावी लागणार आहेत.'
बिल गेट्स यांनी वैद्यकीय पासून शिक्षण क्षेत्रापर्यंत सर्व गोष्टीत AI चांगल्या क्षमतेनं काम करू शकतं असं मत व्यक्त केलं. मात्र बिल गेट्स यांनी यामुळे वर्कफोर्स, हायरिंग पॅटर्न आणि आर्थिक समानता विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचा इशारा देखील दिला. जर याबाबत आतापासूनच काही पावलं उचलली नाही तर याचे गंभीर परिणाम देखील होतील असं बिल गेट्स यांनी सांगितलं.
ते म्हणाले, 'तुम्ही लोकांना कामावर ठेवाल? तुम्ही तुमची कर प्रणाली बदलणार? सध्याच्या घडीला तरी याचा परिणाम खूप मोठा असणार आहे. मात्र हा कायमस्वरूपी राहणार नाही.'
गेल्या वर्षी बिल गेट्स यांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता. या वर्षीही त्याच गोष्टींबाबत बिल गेट्स बोलत आहेत. AI क्रांती ही गेल्या तंत्रज्ञान क्रांतीच्या अनेक पटीने वेगवान असणार आहे. ही समाजात खोलवर प्रभाव करणारी ठरणार आहे. या क्रांतीवेळी बदलाचा वेग हा न भुतो असा असणार आहे.
गेट्स यांनी AI टूल्सनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये यापूर्वीच आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवली आहे. त्यामुळे लॉजेस्टिक आणि सेल सेंटर्समध्ये कमी कुशल कामगारांना त्यांनी रिप्लेस करणं सुरू केलं आहे. जर याबाबत विचार केला गेला नाही तर या बदलामुळे असमानता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे संपत्तीचे केंद्रीदरण आणि फार कमी लोकांना संधी मिळणार आहे.
हा बदल कधीपर्यंत होणार याबाबत बोलताना गेट्स म्हणाले, 'सध्याच्या घडीला याबाबत धोरणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज आहे. जरी वैश्विक तणावाचं वातावरण असलं तरी गेट्स यांनी मुलाखतीत सांगितलं की भारत-अमेरिकेची भागिदारी ही काही भरवशाच्या भागिदारींपैकी असेल असं मत देखील व्यक्त केलं.
ते म्हणाले, 'मला वाटतं की अमेरिका आणि भारतातील चांगले संबंध अधिक दृढ होतील. गेट्स यांनी भारताचे डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि AI चे वेगाने आत्मसात करणे हे फायदेशीर ठरणार आहे.