मान्सून : दिलासादायक अंदाज

मान्सून : दिलासादायक अंदाज

देशभरात सरासरीइतका मान्सून होईल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. पाऊस चांगला झाला तर भूगर्भातील संकोचत असलेल्या जलस्रोतांचेही पुनर्भरण होईल. पर्जन्यजल संचयनाची मोहीम देशभरात मोठ्या प्रमाणावर राबविली गेल्यास चांगल्या मान्सूनचा लाभ कितीतरी अधिक शाश्वत पद्धतीने घेता येऊ शकेल.

स्कायमेट या प्रमुख हवामानविषयक संस्थेने सन 2022 साठी मान्सूनचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. स्कायमेटने असे सांगितले आहे की, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत 2022 मध्ये मान्सून सरासरीइतका राहील. एप्रिल महिन्यात हवामानाचा नूर पाहून स्कायमेट संस्था आपला अंतिम अहवाल जारी करेल. मान्सून कसा असेल याचे उत्तर ला-नीना हालचालींवर अवलंबून असते.

मागील दोन मान्सूनदरम्यान एका पाठोपाठ एक अशा अनेक ला-नीना घटना घडल्या. त्यामुळे देशभरात मान्सून असमतोल राहिला. स्कायमेटच्या मते, ला-नीनोच्या घटना आता कमी होत चालल्या आहेत. त्याचा थेट परिणाम यावर्षीच्या मान्सूनवर होईल.

भारतात मान्सूनच्या चार महिन्यांत 880.6 मिलिमीटर पाऊस पडतो. याला लाँग पीरिअड अ‍ॅव्हरेज असे म्हणतात. स्कायमेट हा आकडा म्हणजेच सरासरी असे मानते. म्हणजेच पावसाचा हा आकडा म्हणजे 100 टक्के पाऊस असे मानले जाते. यावर्षी 907 मिलिमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे.

2021 मध्ये मान्सूनच्या काळात 177.7 मिलिमीटर अधिक पाऊस झाला होता. हा सरासरीपेक्षा 43.54 टक्के अधिक पाऊस आहे. 2020 मध्ये देशात 124.8 मिलिमीटर पाऊस झाला होता. तो सरासरीपेक्षा 0.64 टक्के अधिक होता. अल नीनो हा जलवायू प्रणालीचा एक भाग आहे.

त्याचा हवामानावर सखोल परिणाम होतो. अल नीनाच्या येण्याने संपूर्ण जगभरातील हवामानावर परिणाम दिसून येतो आणि पाऊस, थंडी, उष्णता या सर्व बाबींमध्ये फरक दिसून येतो. दिलासादायक बाब अशी आहे की, ही परिस्थिती दरवर्षी नव्हे तर तीन ते सात वर्षांनी दिसते. अल नीनो घटनेदरम्यान मध्य आणि पूर्व भूमध्य रेषेजवळ प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील पाणी प्रमाणापेक्षा अधिक गरम होते.

पूर्वेकडून पश्चिमेला वाहणारे वारे कमकुवत होतात आणि पश्चिम प्रशांत क्षेत्रात पृष्ठभागाजवळील गरम पाणी भूमध्य रेषेजवळून पूर्वेकडे वाहू लागते. ही प्रक्रिया जैविक, भौतिक आणि रासायनिक अशा परिस्थितकीय तंत्राला सहायक मानली जाते. सरासरीइतक्या पावसाची प्राथमिक भविष्यवाणीही दिलासादायक मानायला हवी. देशातील शेतीबरोबरच संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी ही संतोषजनक बाब आहे.

कृषी क्षेत्राच्या परिस्थितीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असतो. रिझर्व्ह बँकसुद्धा आपल्या चलनविषयक समीक्षेत धोरणात्मक दरांबाबत जे निर्णय घेते, त्यात मान्सूनबाबत वर्तविण्यात येणार्‍या भविष्यवाणीचा पैलू महत्त्वाचा ठरतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news