नाचणी पिकाचे 'असे' करा व्यवस्थापन | पुढारी

नाचणी पिकाचे 'असे' करा व्यवस्थापन

नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि तंतुमय पदार्थ असतात. वजन नियंत्रित करण्यासाठी, हाडांचे आरोग्य राखण्यासाठी, रक्‍तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी, अ‍ॅनिमिया नियंत्रित करण्यासाठी तसेच मधुमेहासाठी नाचणी अतिशय फायदेशीर आहे. नाचणी हे पीक पूर्व मध्य आफ्रिका आणि भारतात घेतले जाते. भारतामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रपदेश, ओडिशा, बिहार, गुजरात, महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधील डोंगराळ भागात घेतले जाते. नाचणी हे भरडधान्य उष्ण हवमानात, हलक्या जमिनीत तसेच इतर तृणधान्य आणि डाळवर्गीय पिकांमधील आंतरपीक म्हणून घेतले जाते. नाचणीचे जास्तीत जास्त क्षेत्र हे कोरडवाहू आणि खरीप हंगामातील आहे.

नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि तंतुमय पदार्थ असतात. वजन नियंत्रित करण्यासाठी, हाडांचे आरोग्य राखण्यासाठी, रक्‍तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी, अ‍ॅनिमिया नियंत्रित करण्यासाठी तसेच मधुमेहासाठी नाचणी अतिशय फायदेशीर आहे. नाचणी हे पीक 120 ते 135 दिवसांत परिपक्‍व होते. चांगले व्यवस्थापन केल्यास 20 ते 25 क्विंटल प्रतिहेक्टरी एवढे धान्य उत्पादन तर 60 ते 80 क्विंटल प्रतिहेक्टरी चार्‍याचे उत्पादन मिळते.

– जगदीश काळे

Back to top button