जनावरांवर औषधी वनस्पतींचे उपचार करताना... | पुढारी

जनावरांवर औषधी वनस्पतींचे उपचार करताना...

मानवाप्रमाणे प्राण्यांनाही विविध प्रकारचे आजार होत असतात. पशुंच्या बर्‍याच आजारांवर औषधी वनस्पतींचा उपयोग करून पशुपालक घरच्याघरी उपचार करू शकतात. अचूक रोगनिदान आणि औषधोपचारासाठी पशुवैद्यकाचा सल्ला आवश्यक असतो. सर्व औषधी
100 ग्रॅमच्या स्वरूपात दिलेल्या आहेत.

1) तोंड येणे/तोंड खुरी : हळद 15, कोरफळ 5, ज्येष्ठमध : 4, अर्जुन साल 10, कात : 2, तुळस : 5, जखमजोडी : 5, कडुलिंब तेल : 4, गेरू : 5 या सर्व औषधी बारीक करून पाणी मिसळून लेप तोडांत द्यावा.

2) पोटफुगी : ओवा 20, दाणे : 10, जिरे : 15 बडीशेप : 10, हळद : 15 काळे मीठ, 30 या सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरात 10 ग्रॅम दिवसातून दोन वेेळेस द्याव्यात.

3) पोटदुखी : पिंपळी : 5, जिरे :15 सुंठ/अद्रक : 20, ओवा : 20, चित्रक, 5 काळेमिरे : 5, वावडींग, 10, हिरडा : 20, वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरात 20-30 गॅ्रम आणि लहान जनावरत 10 गॅॅॅ्रम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

4) अतिसार : (हगवण) कुडा 30, बेल 20, डाळिंबसाल : 20, कात 5, बाभळीचा डिंक :
25. यासर्व बारीक करून मोठ्या जनावरात 20 ग्रॅम आणि लहान जनावरात 10 गॅॅॅ्रम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

5) सर्दी, खोकला, ठसकणे : अडुळसा : 30, तुळस : 20 कात : या सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरात 20-30 ग्रॅम आणि लहान जनावरात 10 गॅ्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

तसेच कापूर : 4, पुदीना : 5, निलगरी तेल 20, विंटरग्रीन तेल 20 हे सर्व तेल एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात 5 ते 10 थेंब टाकून त्याची वाफ जनावरास द्यावी.

– जगदीश काळे

Back to top button