

पुढारी ऑनलाईन डेस्क : चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. हा हिंदू धर्मात खूप शुभ दिवस मानला जातो. हे व्रत श्री गणेशाला समर्पित आहे. आज (दि. १७) चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षात भालचंद्र संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात, शुक्ल पक्षात विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षात संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व दुःख आणि संकटांपासून मुक्तता मिळते. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आज (दि. १७) संध्याकाळी ०७:३३ वाजता सुरू होईल आणि उद्या (दि. १८) रात्री १०:०९ वाजता संपेल. चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय होत असताना हे व्रत पाळले जाते. जर चंद्रदोय व्यापिनी चतुर्थी दोन दिवसांसाठी येत असेल तर पहिला दिवस उपवासासाठी निवडला जातो. आज चंद्रोदयाची वेळ रात्री ९:०५ वाजता असेल.