

Bedroom Privacy Data Leak: भारतातील घरे आता छोटे छोटे डेटा सेंटर होत चालले आहेत. भारताच्या एका मध्यवर्गीय घरात स्मार्ट टीव्ही, स्मार्ट राऊटर, वाय फाय कॅमेरा, स्मार्ट स्पीकर, फिटनेस डिवाईस आणि अनेक सेंसर लावलेले असतात. हे सर्व डिवाईस आपल्या सोयी सुविधेसाठी असतात. मात्र त्यांचा वापर याच्या पलीकडे देखील होत आहे. ते सतत आपला डेटा जनरेट करत असतात. प्रत्येक क्लिक किंवा कमांडनंतर ही माहिती कुठे ना कुठे पाठवली जाते.
भारतात गेल्या काही वर्षात स्मार्ट होम डिवाईसचा वापर तुफान वाढला आहे. स्वस्तात स्मार्ट टीव्ही, वायफाय आणि सहज इन्स्टॉलेशनमुळे हे सर्व डिवाईस मध्यमवर्गीयांच्या घरात सहज पोहचले आहेत.
जसजसे हे डिवाईस वाढत गेले तसतसे घरातून निघणारा डेटा देखील कित्येक पटीनं वाढला आहे. हा डेटा फक्त इंटरनेट युसेजपर्यंत मर्यादित नसून आता तो दैनंदिन सवय होत चालला आहे. हा डेटा ऐकणाऱ्याला तुमची आवड, घरात असणाऱ्या लोकांची संख्या, त्यांचे रूटीन याची सर्व माहिती देऊ शकतो.
सध्याच्या घडीला स्मार्ट टीव्हीमधून होणाऱ्या डेटा लीकची चर्चा सर्वात जास्त होत आहे. स्मार्ट टीव्ही फक्त स्क्रीन नाही तर तो एक कनेक्टेड प्लॅटफॉर्म आहे. अनेक टीव्हीमध्ये ऑटोमेटिक कंटेट रिकग्नेशन सारखे तंत्रज्ञान असतं. याद्वारे स्क्रीनवर काय सुरू आहे हे ओळखू शकतात. मग तुम्ही ओटीटीवर काय पाहताय, पेन ड्राईव्ह लावून काय पाहताय याचा सर्व पॅटर्न सर्व्हरला पुरवला जाऊ शकतो. या डेटाला वापर अचून जाहिरात तुमच्यापर्यंत पोहचवणं अन् युजर प्रोफाईल तयार करणं यासाठी केला जाऊ शकतो.
राऊटर आणि स्मार्ट स्पीकर देखील याचाच भाग आहे. राऊटर तुमच्या घरातील कोणते डिवाईस कधी अन् किती डेटा वापरतं याचा हिशेब ठवतं. स्मार्ट स्पीकर व्हॉईस कमांडला प्रोसेस करण्यासाठी क्लाऊडशी कनेक्ट होतो. कित्येकवेळा चांगल्या सेवेच्या नावाखाली तुमची माहिती स्टोअर आणि अॅनलाईज केली जाते. छोटे स्मार्ट प्लग आणि कॅमेरे देखील सतत त्यांच्या सर्व्हरसोबत जोडलेले असतात अन् अॅक्टिव्हली डेटा पाठवत असतात.
विशेष म्हणजे या डिवाईसमधून गोळा केलेला सर्व डेटा जातो कुठं हा प्रश्न आहे. या डेटामुळे फक्त डिवाईस तयार करणाऱ्या कंपनीला फायदा होत नाही तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, क्लाऊड कंपनी, अॅड नेटवर्क आणि अॅनलिस्ट फर्म यांना कशा न कशा प्रकारे हा डेटा पोहचतो. घरातून मिळालेली ही माहिती हळू हळू जाहिरात आणि व्यावसायिक निर्णय घेणासाठी वापरली जाते.
सर्वात मोठी समस्या ही याबाबत ग्राहक जागरूकतेचा आहे. अनेक लोकं डिवाईस सेट करताना प्रायव्हसी नियम वाचत नाहीत. अनेकवेळा ट्रॅकिंग आणि डेटा शेअरिंग बाय डिफॉल्ट सुरू असते. सेटिंगमध्ये जाऊन ते बंद करणं सोपं नसतं. सामान्य युजर्सना हे देखील माहिती नुसतं की कोणचं फिचर त्यांची कोणती माहिती ट्रॅक करत आहे.
भारतात डेटा सुरक्षेबाबत कायदा आहे. मात्र घरातील डिवाईसमधून लीक होणारा डेटाबाबत स्पष्ट निर्देश नाहीयेत. पॉलिसी आणि ग्राहकांची जनजागृती यामध्ये मोठा गॅप आहे. जर एखाद्या युजरला त्याच्या घरातून किती डेटा निर्माण होत आहे हेच जर समजत नसेल तर तो त्याबाबत प्रश्न कसा विचारणार?
आता घराच्या भिंती फक्त आवाज ऐकत नाहीत तर ते डेटा देखील पाठव आहेत. जर याच्यावर वेळीच लक्ष दिलं नाही तर प्रायव्हसी आणि डिजीटल सर्व्हेलन्स याच्यातील मर्यादा अजूनच अस्पष्ट होत जाईल. त्यामुळे घर स्मार्ट बनवण्यासोबतच आपण हे का करत आहोत याचा देखील विचार केला गेला पाहिजे.