War and water| युद्ध आणि पाणी : जागतिक संघर्षातील अदृश्य आयाम

मानवाच्या इतिहासात जमीन, सत्ता आणि नैसर्गिक संसाधनांवरून अनेक युद्धे झाली आहेत; परंतु 21व्या शतकात एक नवीन आणि गंभीर घटक पुढे येताना दिसतो, तो म्हणजे पाणी
War and water
War and waterPudhari
Published on
Updated on
डॉ. मंगेश कश्यप

मानवाच्या इतिहासात जमीन, सत्ता आणि नैसर्गिक संसाधनांवरून अनेक युद्धे झाली आहेत; परंतु 21व्या शतकात एक नवीन आणि गंभीर घटक पुढे येताना दिसतो, तो म्हणजे पाणी. हवामान बदल, वाढती लोकसंख्या आणि जलस्रोतांवरील वाढता ताण यामुळे पाणी हे केवळ जीवनाचे साधन राहिलेले नाही, तर अनेक ठिकाणी ते सामरिक व राजकीय साधनही बनले आहे. त्यामुळे युद्ध आणि पाणी हा विषय आता जागतिक राजकारण, पर्यावरण आणि मानवी सुरक्षेशी थेट जोडला गेला आहे.

सध्याच्या जागतिक परिस्थितीकडे पाहिले, तर अनेक संघर्षांमध्ये पाण्याचे महत्त्व दिसून येते. उदाहरणार्थ र्ठीीीळर-णज्ञीरळपश थरी मध्ये धरणे, कालवे आणि जलपुरवठा यंत्रणा यांचे महत्त्व अधोरेखित झाले. काही भागांमध्ये जलवाहिन्या आणि जलशुद्धीकरण केंद्रांवर झालेल्या हल्ल्यांमुळे लाखो नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या. पाणीपुरवठा खंडित झाल्यास त्याचा परिणाम केवळ पिण्याच्या पाण्यावर होत नाही, तर आरोग्य, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेवरही होतो.

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवरही पाणी हा संवेदनशील मुद्दा आहे. खीीरशश्र-खीरप लेपषश्रळलीं या व्यापक तणावाच्या पार्श्वभूमीवर जलस्रोतांचे संरक्षण आणि नियंत्रण ही महत्त्वाची बाब ठरते. इस्रायल, इराण आणि आसपासच्या प्रदेशात पाणी आधीच मर्यादित असल्यामुळे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली, तर जलसुरक्षेचा प्रश्न अधिक तीव्र होतो. अशा स्थितीत जलस्रोतांवर नियंत्रण मिळवणे हीही एक रणनीतिक बाब बनू शकते.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाचा परिणाम पर्शियन आखात परिसरावरही दिसून येतो. या भागातील समुद्री मार्ग आणि ऊर्जा वाहतूक मार्ग हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहेत. युद्धजन्य परिस्थितीत तेलगळती किंवा सागरी प्रदूषण झाल्यास त्याचा परिणाम समुद्रातील जलपरिसंस्था आणि किनारी भागांतील जीवनावर होऊ शकतो. त्यामुळे युद्धाचा प्रभाव केवळ रणांगणापुरता मर्यादित राहत नाही. तो समुद्र, नद्या आणि पर्यावरणावरही पडतो.

युद्ध काळात जलव्यवस्थापन करणे ही मोठी आव्हानात्मक गोष्ट असते. धरणे, पंपिंग स्टेशन, जलवाहिन्या आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. परिणामी, शहरांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होतो. स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्यास संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो आणि मानवी संकट निर्माण होते.

आधुनिक युद्धात वापरली जाणारी क्षेपणास्त्रे, स्फोटके आणि इतर शस्त्रे पर्यावरणावरही दीर्घकालीन परिणाम घडवतात. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्फोटांमुळे माती, भूजल आणि जलस्रोत प्रदूषित होण्याची शक्यता असते. काही वेळा रासायनिक पदार्थ किंवा धातूंचे अवशेष जलस्रोतांमध्ये मिसळतात. यामुळे पाण्याची गुणवत्ता कमी होते आणि परिसंस्थेवर दीर्घकालीन परिणाम होतो. युद्धाचा सर्वाधिक परिणाम सामान्य नागरिकांवर होतो. पाणीपुरवठा खंडित झाल्यास महिलांना व मुलांना पाण्यासाठी लांब अंतर चालावे लागते. विस्थापित लोकांसाठी सुरक्षित पाणी मिळवणे कठीण होते. शेतीवर परिणाम झाल्यामुळे अन्नसुरक्षा धोक्यात येते आणि स्थानिक अर्थव्यवस्था कमकुवत होते.

शाश्वत विकासाच्या दृष्टीने पाहिले, तर युद्ध ही मोठी अडथळा ठरते. जलसंधारण, सिंचन आणि पाणीपुरवठा सुधारणा यांसारखे विकास प्रकल्प युद्धामुळे थांबतात किंवा नष्ट होतात. परिणामी, समाजाच्या विकासाचा वेग मंदावतो. म्हणूनच भविष्यातील जगासाठी पाण्याकडे संघर्षाचे कारण म्हणून नव्हे, तर सहकार्याचे साधन म्हणून पाहणे आवश्यक आहे. जलस्रोतांचे सामायिक व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय करार आणि शाश्वत जलनीती यांद्वारे अनेक संभाव्य संघर्ष टाळता येऊ शकतात. कारण, शेवटी पाणी हे केवळ संसाधन नाही. ते मानवजातीच्या अस्तित्वाचा आधार आहे आणि म्हणूनच शांततेचा मार्ग जलसहकार्याच्या विचारातूनच पुढे जाऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news