horror movie : भयपटांचा सिलसिला कायम

भूत आणि प्रेतात्म्यांचा प्रभाव चित्रपटांवरही पडलेला आहे
The horror movie streak continues
भयपटांचा सिलसिला कायमPudhari File Photo
Published on
Updated on
सोनम परब

भारतीय समाजात जन्म, मृत्यू, पुनर्जन्म, आत्मा आणि भूत यांच्याशी संबंधित श्रद्धा खोलवर रुजलेल्या आहेत. यावर आधारित असंख्य किस्से आणि कथाही प्रचलित आहेत. जे लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, तेही पूर्णपणे त्यांना नाकारत नाहीत. आजही भूत-प्रेत खरंच असतात का की फक्त एक भ्रम आहे, यावर वाद सुरू आहेत. या भूत आणि प्रेतात्म्यांचा प्रभाव चित्रपटांवरही पडलेला आहे. कृष्णधवल काळापासूनच भूत-प्रेतांच्या गोष्टी चित्रपटांतून मांडल्या जात आहेत. तांत्रिक प्रगती झालेली असली, तरीही आपल्या चित्रपटांनी या विषयातून फारशी सुटका केलेली नाही. फक्त आजच्या काळात भीतीसोबत मनोरंजनाचं नवं रूप पाहायला मिळतं. कधी या गोष्टींना विनोदाशी जोडलं जातं, तर कधी बदला घेण्याच्या कथांसोबत!

प्रेक्षकांना आकर्षित करणारा प्रत्येक विषय चित्रपट निर्माते- दिग्दर्शकांसाठी आवडता असतो. विनोदी कथा, प्रेमकथा, रहस्यकथा यासारख्या लोकप्रिय विषयांव्यतिरिक्त भीती हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे, जो नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे. कृष्णधवल चित्रपटांच्या काळापासून आजतागायत भूत, प्रेत आणि आत्म्यांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवले जात आहेत. नव्या जमान्यात या भीतीसोबत विनोदाचा मसालाही जोडण्यात आलेला दिसतो. ‘स्त्री’ आणि ‘भूलभुलैया’ यासारख्या चित्रपटांच्या यशामागे हेच सूत्र होते. ‘मुंजा’देखील अशाच धर्तीचा चित्रपट होता. या तिन्ही चित्रपटांनी घवघवीत यश मिळवलं. केवळ प्रेक्षकांना घाबरवणं हेच यामध्ये उद्दिष्ट नसतं, तर निखळ मनोरंजन आणि हास्यनिर्मिती करणे हाही यातील गाभ्याचा भाग असतो.

भारतीय समाजात जन्म, मृत्यू, पुनर्जन्म, आत्मा आणि भूत यांच्याशी संबंधित श्रद्धा खोलवर रुजलेल्या आहेत. यावर आधारित असंख्य किस्से आणि कथाही प्रचलित आहेत. जे लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, तेही पूर्णपणे त्यांना नाकारत नाहीत. आजही भूत-प्रेत खरंच असतात का की फक्त एक भ्रम आहे, यावर वाद सुरू आहेत. या भूत आणि प्रेतात्म्यांचा प्रभाव चित्रपटांवरही पडलेला आहे. कृष्णधवल काळापासूनच भूत-प्रेतांच्या गोष्टी चित्रपटांतून मांडल्या जात आहेत. तांत्रिक प्रगती झालेली असली, तरीही आपल्या चित्रपटांनी या विषयातून फारशी सुटका केलेली नाही. फक्त आजच्या काळात भीतीसोबत मनोरंजनाचं नवं रूप पाहायला मिळतं. कधी या गोष्टींना विनोदाशी जोडलं जातं, तर कधी बदला घेण्याच्या कथांसोबत. काही कथांमध्ये एका जन्मातून दुसर्‍या जन्मात पोहोचणार्‍या प्रेमकथा गुंफल्या जातात. अशा कथा कधीच जुन्या होत नाहीत, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.

चित्रपटांमध्ये भूत-प्रेताच्या कथानकाची सुरुवात 1949 मध्ये कमाल अमरोही यांच्या ‘महल’ या चित्रपटाने झाली. या चित्रपटात अशोक कुमार आणि मधुबाला प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटात नायिका एक भटकती आत्मा असल्याचं भासतं; पण अखेरच्या टप्प्यावर कळतं की, ती खरीच जिवंत स्त्री आहे. यानंतर 1962 मध्ये आलेली ‘बीस साल बाद’, 1964 ची ‘वो कौन थी’ आणि 1965 मधील ‘भूत बंगला’ या चित्रपटांमध्येही अशीच भीतीदायक कथानकं होती. विशेष म्हणजे, अशा बहुतांश चित्रपटांमध्ये भूत किंवा भटकती आत्मा यांना अपयशी प्रेम किंवा बदला घेण्याची भावना यांच्याशी जोडलं गेलं. चित्रपटांमध्ये भूत दोन प्रकारांनी दाखवले गेले, एकतर सूड घेणारे भूत किंवा दुसर्‍यांना मदत करणारे भूत!

80 आणि 90 च्या दशकात ‘रामसे ब्रदर्स’ यांनी बनवलेले चित्रपट रक्ताने माखलेल्या चेहर्‍यांची भीतीदायक भूतं दाखवणारे होते. यानंतर भूतांना त्रिशूळ किंवा क्रॉसच्या साहाय्याने नष्ट करताना दाखवलं जाऊ लागलं. याच दरम्यान ‘जॉनी दुश्मन’सारखी मल्टीस्टारर फिल्म आली. 2007 मध्ये प्रियदर्शन यांनी ‘भूलभुलैया’मध्ये आत्म्याचं रूप दाखवलं. चित्रपटांमधील भूत नेहमीच त्रासदायक असतील असं नाही. काही चित्रपटांमध्ये भूत प्रेक्षकांना मदत करणारेही दाखवले गेले. ‘भूतनाथ’, ‘भूतनाथ रिटर्न्स’ आणि ‘अरमान’मध्ये अमिताभ बच्चन यांनी मदत करणार्‍या भूतांची भूमिका केली आहे. ‘हॅलो ब्रदर’मध्ये सलमान खान यांनी अरबाज खानच्या शरीरात प्रवेश करून मदत केली होती. ‘चमत्कार’मध्ये नसीरुद्दीन शाह यांनी शाहरूख खानला मदत केली. ‘भूत अंकल’मध्ये जॅकी श्रॉफ आणि ‘वाह! लाईफ हो तो ऐसी’ मध्ये शाहिद कपूरला यमराजाची भूमिका करणार्‍या संजय दत्तकडून मदत मिळताना दाखवलं आहे. ‘टार्झन ः द वंडर कार’मध्येही अशीच गोष्ट आहे.

विक्रम भट्ट यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांनाही भूतपट बनवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी ‘राज’च्या यशानंतर याचे अनेक सिक्वेल्स तयार केले. विक्रम भट्ट यांनी ‘1920’, ‘1920 : इव्हिल रिटर्न्स’, ‘शापित’, ‘हॉन्टेड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूतांचे दर्शन घडवले. 2003 मध्ये अनुराग बासूंनी ‘साया’सारखा चित्रपट बनवला. प्रयोगशील दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी तर ‘भूत’ या शीर्षकानेच चित्रपट बनवला आणि त्यानंतर ‘फूंक’, ‘फूंक-2’, ‘डरना मना हैं’, ‘डरना जरुरी हैं’, ‘वास्तुशास्त्र’, ‘भूत रिटर्न्स’ असे चित्रपट केले. अनुष्का शर्मा या नव्या पिढीच्या अभिनेत्रीने ‘फिल्लौरी’मध्ये केवळ भूताची भूमिका साकारली नाही, तर स्वतः निर्मातादेखील राहिली. 1991 मध्ये आलेला माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांचा ‘100 डेज’ हा चित्रपट संपूर्ण काळ सस्पेन्स ठेवून यशस्वी झाला. 2008 मध्ये आलेल्या ‘फूंक’ चित्रपटाबद्दल रामगोपाल वर्मा यांनी घोषणा केली होती की, जर कोणी एकट्यानं थिएटरमध्ये हा चित्रपट न घाबरता पाहिला, तर त्याला 5 लाखांचं बक्षीस दिलं जाईल.

‘डरना मना हैं’, ‘वास्तुशास्त्र’ (2004) या चित्रपटात सुष्मिता सेन आणि जेडी चक्रवर्ती होते हे चित्रपटही चांगले गाजले. ‘हॉन्टेड 3डी’ (2011) मध्ये, तर 3डी तंत्रज्ञानाचा वापर करून भूतांचं भय दाखवलं गेलं. ‘1920’ या चित्रपटात तर भूत-प्रेतांचं भीषण रूप कमालीचं प्रभावीपणे मांडलं गेलं. अनेक भीतीदायक चित्रपटांमध्ये पौराणिक कथांचा आधार घेतलेला आढळतो. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’ व नंतरच्या ‘स्त्री-2’ या चित्रपटांमध्ये एका गावात रात्री माणसांना उचलून नेणार्‍या चेटकिणीची गोष्ट दाखवली गेली. घराच्या बाहेर ‘नाले बा’ (उद्या या) असं लिहून ठेवण्याची प्रथा दाखवण्यात आली. अनुष्का शर्माचा ‘परी’ हा एक पौराणिक कथांवर आधारित भीतीदायक चित्रपट होता. यात तिने ‘इरफित’ (भूतबाधित आत्मा) रुखसाना हिची भूमिका साकारली होती. बिपाशा बसू आणि डिनो मोरियाचा ‘राज’ हा त्या काळातील सर्वोत्कृष्ट भीतीदायक चित्रपटांपैकी एक आहे. अनुष्का शर्मा निर्मित ‘बुलबुल’मध्ये 19व्या शतकातील बंगालच्या पार्श्वभूमीवर बनवलेली चेटकिणीची अनोखी गोष्ट मांडली आहे. ‘एक थी डायन’ या इम्रान हाशमीच्या चित्रपटात जादूटोणाच्या प्रभावाखालील डायनची गोष्ट दाखवली गेली होती. हा चित्रपटही पौराणिक कथांवर आधारित होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news