

नीती मेहेंदळे
ज्या काळात विश्वंतरांचा जन्म झाला, त्याच काळात ‘पच्चया’ नावाच्या एका जादुई शक्ती असलेल्या पांढऱ्या हत्तीचाही जन्म झाला होता. विश्वंतर इतके परोपकारी होते की, त्यांनी तो हत्ती शेजारील राज्यातील ब्राह्मणांना दान म्हणून देऊन टाकला.
ठाणे जिल्हा म्हणजे उत्तर अपरान्त प्रांत. शिलाहार राजवटीने इथे राज्य केल्याचे पुष्कळ पुरावे उपलब्ध आहेत. ठाणे हे तर उत्तर कोकण शिलाहारांचं श्रीस्थानक, राजधानीचं ठिकाण. या राजधानीत आणि तिला वेढून असलेल्या गावागावांत शिलाहारांच्या, धार्मिक स्थळांप्रती असलेल्या आत्मीयतेची आणि औदार्याची उदाहरणं सापडत राहतात. सापडली आहेत. अंबरनाथचं मंदिर, तलावपाळीजवळचं कौपिनेश्वर, शिळ फाट्याजवळचं खिडकाळेश्वर, वसई-पारोळ गावातली शिव मंदिरं ही त्यांतली काही मुख्य मंदिरं आजही अस्तित्वात आहेत. कल्याण प्राचीन बंदर होतं हे आपल्याला माहीतच आहे. पण त्याजवळ मिठाच्या उत्पादनाचं मोठं केंद्र होतं हे तितकं लोकांना माहिती नसावं. लोनाड हे कल्याण व भिवंडी गावांना लगत असलेलं उत्तर दिशेतलं एक साधं खेडेगाव. कल्याणपासून भिवंडी गावाबाहेरून नाशिकला जाणारा बायपास पकडला की, पुढेच सोनाळे फाटा नामक फाटा लागतो. या सोनाळे गावातही एक जुनं मंदिर आहे. या फाट्यावरून कच्चा रस्ता आपल्याला लोनाड गावात नेतो. या लोनाड गावात एक शिलाहारकालीन शिवमंदिर आहे.
या मंदिराची बरीच पडझड झाली असून त्याचा व गावाचा इतिहास प्राचीन आहे. मंदिराच्या बाह्य संरचनेचे नूतनीकरण झालेले नाही आणि त्याचे शिखरही नष्ट झाले आहे. परंतु गर्भगृह मात्र सुस्थितीत आहे. शिलाहार राजा अपरादित्य याच्या शके ९१९ मधील ताम्रपटात या मंदिराचा लोणादित्य मंदिर व लोनाड गावाचा लवणेतट असा उल्लेख आढळतो. लवणेतट या नावावरून लोनाड हे मीठ उत्पादनाचे मोठे केंद्र होते, असं सिद्ध होतं. शिलाहार राजा मल्लिकार्जुन याचा वसई येथील १०८३ मधील शिलालेख मंदिराच्या दुरुस्तीच्या कामाची नोंद देतो. यात ‘लोना’ (जे आजचे ‘लोनाड’ आहे) नावाच्या एका बागेचे दान स्थानिक प्रमुखाला किंवा उपाध्यायाला दिल्याचा उल्लेख आहे. दुसरा अपरादित्य याच्या लोनाडच्या शके ११०६ मधील शिलालेखातही लोनाडच्या मंदिराचे महत्त्वाचे उल्लेख आढळतात. इतका हा प्राचीन इतिहास आहे. या शिवमंदिरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. अंबरनाथच्या अम्रेश्वराप्रमाणे हेही प्राचीन मंदिर समजले जाते. लोनाडच्या पुढे चौधरपाडा गावात महादेव मंदिराजवळ एक मोठा संस्कृत शिलालेख सापडला आहे. त्यात शापवाणीही आहे. सहा फुटांचा हा दानलेख शिलाहार राजा दुसरा केशिदेव याचा असून शिलालेखाबरोबर त्यात चंद्र, सूर्य व गदर्भ शापवाणी कोरली आहे.
लोनाड गावाबाहेर एक बेताच्या उंचीचे टेकाड आहे. गावाबाहेर या छोट्या टेकडीवर काही लेणी आहेत. लेण्यांच्या पायथ्याशी जानवल नावाचं एक गाव आहे. इथे बहुतेक करून दगड कापण्याचे काम नेहमी चालू असते. एक लहानसे मंदिर टेकडीवर आहे, ते खालूनही दिसतं. मंदिराजवळूनच लोनाडच्या लेण्यांकडे जाणारा रस्ता आहे. २०/२५ मिनिटांच्या सरळसोट चालीनंतर आपण दोन टेकांडांच्या मधल्या पाखेत जाऊन पोहोचतो. शेवटपर्यंत येथे काही लेणी वगैरे आहेत याचा अंदाज येत नाही. वरवर पाहता ती साधी कमी कोरीव काम असलेली अर्धवट लेणी वाटत असली तरी लेण्यांच्या आतील व आजूबाजूचे ऐतिहासिक पुरावे पाहता या लेण्यांचं वय पार १५०० वर्षे असावं, असं अभ्यासकांचं मत आहे. पाचव्या शतकात ही कल्याण - जुन्नर व्यापारी मार्गावर खोदण्यात आलेली लेणी असावीत. लोनाड लेणींची निर्मिती मुळात बौद्ध भिक्खूंनी केली होती, जे नालासोपारा बंदरातून येथे आले असावेत. हे भिक्खू कल्याण-जुन्नर या व्यापारी मार्गाने जुन्नरला गेले असावेत. त्या काळात जुन्नर हे सातवाहन साम्राज्याचे राजधानीचे ठिकाण होते आणि तिथे सातवाहन राजा सातकर्णीचे राज्य होते. परंतु इतर काही लेण्यांप्रमाणे काळाच्या ओघात त्यांचं रुपांतर हिंदू धार्मिक स्थळांमध्ये झाले असून येथे आता पूजा-प्रार्थना केली जाते. आज एका लेण्यात खंडेश्वरी देवीची स्थापना केलेली दिसते आणि दुसऱ्या लेण्यात शिवलिंग आहे.
लेण्यांचा पुढचा भाग बेडसे, कार्ले लेण्यांप्रमाणे ऐसपैस आहे. लेण्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस एक थंड पाण्याचे टाके आहे. पण पाणी पिण्यायोग्य नसावे. या लेणी समूहातील मुख्य आकर्षण म्हणजे 'चैत्य' असून या रचनेवर अत्यंत सूक्ष्म आणि नक्षीदार कोरीव काम केलेले आहे. खंडेश्वरी मंदिरात एक सभा मंडप, गर्भगृह आणि दुहेरी ओसरी आहे. लेणींच्या प्रवेशद्वारावरील आडव्या पट्टीवर अनेक चित्रे कोरलेली आहेत, येथे बुद्धांच्या पूर्वजन्मांच्या कथा (जातक कथा) कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे एका लेण्यात सहा बाय चार फुटाचे दगडातील एक वैशिष्ट्यपूर्ण कोरीव शिल्प आहे. काहींच्या मते ते एका बौद्ध जातककथेचे कथन शिल्प आहे तर काहींच्या मते इराणचा राजा दुसरा खुश्रू याने चालुक्य राजा पुलकेशीच्या दरबाराला भेट दिली त्याचे कथन शिल्प असावे. त्या शिल्पात राजा, राजाचे पाय चेपणारी दासी, राणी, सेविका, मंत्री वगैरे २० व्यक्ती शिल्पात कोरल्या आहेत. हे शिल्प आजही अगदी उत्तम स्थितीत आहे. त्यात सेविका राजाचे पाय चेपत आहे, असेही शिल्पात स्पष्ट दिसून येते. बौद्ध धर्मातील लोकप्रिय जातक कथांपैकी एक म्हणजे ‘वेस्संतरा जातक’. ज्यांना याबद्दल माहिती आहे, त्यांना गुहेतील स्तंभांच्या वर कोरलेले हे फलक दिसून येतील. बुद्धांच्या पूर्वजन्मांपैकी एका जन्मात ते ‘वेस्संतरा’ (विश्वंतर) नावाचे एक अत्यंत उदार राजकुमार होते. त्यांनी आपली सर्व सांसारिक बंधने त्यागून आपल्या दैवी उदारतेचे दर्शन घडवले. या घटनेला ‘महाजन्म कथा’ (Great Birth Sermon) म्हणून ओळखले जाते. विश्वंतर (वेस्संतर) हे एक अत्यंत दानशूर आणि परोपकारी बोधिसत्त्व होते. त्यांचा जन्म ‘जेतुत्तर’ राज्यात झाला होता. ज्या काळात विश्वंतरांचा जन्म झाला, त्याच काळात ‘पच्चया’ नावाच्या एका जादुई शक्ती असलेल्या पांढऱ्या हत्तीचाही जन्म झाला होता. विश्वंतर इतके परोपकारी होते की, त्यांनी तो हत्ती शेजारील राज्यातील ब्राह्मणांना दान म्हणून देऊन टाकला. या हत्तीमध्ये पाऊस पाडण्याची अद्भुत शक्ती होती. शेजारील राज्यातील ब्राह्मणांनी विश्वंतरांवर दबाव आणून त्यांना तो हत्ती देण्यास भाग पाडले. विश्वंतरांच्या या निर्णयामुळे जेतुत्तर राज्यातील लोक अत्यंत नाराज झाले. त्यांनी राजा संजय यांच्याकडे अशी मागणी केली की, विश्वंतरांना राज्यातून हाकलून द्यावे आणि कायमचे जंगलात वनवासासाठी पाठवून द्यावे.
ही जातक कथा गुहेतील स्तंभांच्या बाहेर, उजव्या भिंतीवरही कोरलेली आढळते. या दृश्यात, प्रजेच्या तक्रारींनंतर राजा संजय हे विश्वंतरांना वनवासात पाठवत असल्याचे दर्शवण्यात आले आहे. लेण्याच्या ललाटपट्टीवरही काही चांगली शिल्पे कोरली आहेत. याव्यतिरिक्त, येथे 'हारीती' (जी कुटुंबाची रक्षक देवी मानली जाते) आणि 'पंचिक' (ज्याला समृद्धीचा देव मानले जाते) यांच्याशी संबंधित शिल्पपटही पाहायला मिळतात. या गुहा संकुलामध्ये एक आतील कक्ष (अंतर्कक्ष) आहे. या कक्षात जाण्यासाठी व्हरांड्यातून तीन मार्ग आहेत. यापैकी मधला मार्ग इतर दोन मार्गांपेक्षा मोठा असून, तो या आतील कक्षाचे मुख्य प्रवेशद्वार असावा असे वाटते. आतील कक्षात एक लहान गर्भगृह आहे. येथे महिषासुरमर्दिनी आणि खंडेश्वरी देवीच्या मूर्ती आहेत. या कक्षाच्या मध्यभागी एक आयताकृती यज्ञकुंड आहे. कक्षाच्या अगदी डाव्या बाजूला काही दगडी ढिगारे आहेत, जे कदाचित अपूर्ण मूर्ती किंवा त्यांचे अवशेष असावेत. येथे एक बाह्य कक्षही आहे. या बाह्य कक्षाच्या बाहेरील भिंतीवर एक प्रवेशद्वार आहे, जेथून गर्भगृहात किंवा आतील कक्षात जाता येते. बाह्य कक्षाच्या मागील भिंतीच्या दोन्ही टोकांना काही मूर्ती आहेत. उजव्या बाजूला गणेशाची मूर्ती असून, तिच्यासोबत गणेशाचे वाहन असलेला उंदीरही आहे. परंतु इतर ठिकाणच्या लेण्यांमधल्या कामापेक्षा हे काम कमी दर्जाचे वाटते. लेण्यात प्रवेश कल्यावर प्रथम व्हरांडा (दगडी) असून मग गर्भगृह आहे. या जागेवर हे एकच लेणे आहे याचे कुतूहल वाटतेलोनाड लेण्यांमधील कोरीव कामे आणि दगडी शिल्पे बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. परंतु काळाच्या ओघात पर्यावरणाशी संबंधित घटकांमुळे काही प्रमाणात नुकसानही झाले आहे. जवळील बांधकाम कार्यामुळे या लेण्यांच्या जतनावर काही प्रमाणात परिणाम झाला असला, तरी त्यांचे ऐतिहासिक मूल्य आजही महत्त्वपूर्ण आहे.
ही जातक कथा गुहेतील स्तंभांच्या बाहेर, उजव्या भिंतीवरही कोरलेली आढळते. या दृश्यात, प्रजेच्या तक्रारींनंतर राजा संजय हे विश्वंतरांना वनवासात पाठवत असल्याचे दर्शवण्यात आले आहे. लेण्याच्या ललाटपट्टीवरही काही चांगली शिल्पे कोरली आहेत. याव्यतिरिक्त, येथे 'हारीती' (जी कुटुंबाची रक्षक देवी मानली जाते) आणि 'पंचिक' (ज्याला समृद्धीचा देव मानले जाते) यांच्याशी संबंधित शिल्पपटही पाहायला मिळतात.
या गुहा संकुलामध्ये एक आतील कक्ष (अंतर्कक्ष) आहे. या कक्षात जाण्यासाठी व्हरांड्यातून तीन मार्ग आहेत. यापैकी मधला मार्ग इतर दोन मार्गांपेक्षा मोठा असून, तो या आतील कक्षाचे मुख्य प्रवेशद्वार असावा असे वाटते. आतील कक्षात एक लहान गर्भगृह आहे. येथे महिषासुरमर्दिनी आणि खंडेश्वरी देवीच्या मूर्ती आहेत. या कक्षाच्या मध्यभागी एक आयताकृती यज्ञकुंड आहे. कक्षाच्या अगदी डाव्या बाजूला काही दगडी ढिगारे आहेत, जे कदाचित अपूर्ण मूर्ती किंवा त्यांचे अवशेष असावेत. येथे एक बाह्य कक्षही आहे. या बाह्य कक्षाच्या बाहेरील भिंतीवर एक प्रवेशद्वार आहे, जेथून गर्भगृहात किंवा आतील कक्षात जाता येते. बाह्य कक्षाच्या मागील भिंतीच्या दोन्ही टोकांना काही मूर्ती आहेत. उजव्या बाजूला गणेशाची मूर्ती असून, तिच्यासोबत गणेशाचे वाहन असलेला उंदीरही आहे. परंतु इतर ठिकाणच्या लेण्यांमधल्या कामापेक्षा हे काम कमी दर्जाचे वाटते. लेण्यात प्रवेश कल्यावर प्रथम व्हरांडा (दगडी) असून मग गर्भगृह आहे. या जागेवर हे एकच लेणे आहे याचे कुतूहल वाटतेलोनाड लेण्यांमधील कोरीव कामे आणि दगडी शिल्पे बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. परंतु काळाच्या ओघात पर्यावरणाशी संबंधित घटकांमुळे काही प्रमाणात नुकसानही झाले आहे. जवळील बांधकाम कार्यामुळे या लेण्यांच्या जतनावर काही प्रमाणात परिणाम झाला असला, तरी त्यांचे ऐतिहासिक मूल्य आजही महत्त्वपूर्ण आहे.