

आपण एका नव्या युगात प्रवेश करत आहोत. शास्त्रज्ञ त्याला ‘अॅथ्रोपोसीन एज’ म्हणत आहेत. ते मानवी घडामोडींचा पृथ्वीच्या हवामान बदल आणि पर्यावरणावर मोठा परिणाम होत असल्याचे द्योतक आहे. हा व्यापक बदलाचा काळ आहे. ट्रम्प यांनी व्यापारयुद्ध सुरू करत उद्योग मायदेशी आणण्याची हमी दिली आहे. मात्र त्यामुळे पर्यावरण आणि आर्थिक दृष्टिकोनातून खर्च वाढणार आहे.
आपण सध्या खूप उलथापालथ असलेल्या काळात राहात आहोत. सध्याचे जग हे भूराजकीय हालचाली आणि संघर्षाने वेढलेले आहे. सध्या आर्थिक मंदी आणि व्यापार युद्धाचे सावट आहे. नैसर्गिक स्रोत वेगाने कमी होत आहेत आणि पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. 2024 हे खर्या अर्थाने जगाला बदलून टाकणारे वर्ष राहिले. प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे हवामानाने आपला हिसका दाखविला आहे. तापमानाचा विक्रम नोंदला गेला तर त्याचवेळी मोडला देखील. जी मंडळी पूर्वीपासूनच बिकट स्थितीत राहात होती, ती सततच्या नैसर्गिक संकटामुळे एवढी घायाळ झाली की, त्यांना पुन्हा उभे राहण्याची शक्तीच राहिली नाही.
आपण एका नव्या युगात प्रवेश करत आहोत. शास्त्रज्ञ त्याला ‘अॅथ्रोपोसीन एज’ म्हणत आहेत. ते मानवी घडामोडींचा पृथ्वीच्या हवामान बदल आणि पर्यावरणावर मोठा परिणाम होत असल्याचे द्योतक आहे. हा व्यापक बदलाचा काळ आहे. परस्पर संबंध ठेवताना मनुष्याच्या वर्तनातही बदल जाणवत आहेत. चूक आणि बरोबर याचे जागतिक निकष बदलत आहेत. ‘एआय’सारख्या शक्तीत बदल होत आहेत आणि ते आगामी काळात जवळपास प्रत्येक गोष्टींवर निंयंत्रण ठेवेल.
या काळात आपण सर्वांनीच टेक कंपन्यांवर अधिक भरवसा ठेवला आहे. आजच्या बड्या टेक कंपन्या एखाद्या साम्राज्यासारख्या वावरत आहेत आणि त्यांच्या हाती सर्वांच्याच नाड्या आहेत. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटकावर त्याचा परिणाम झाला आहे. या कंपनीची सूत्रे ज्याच्या हाती, तो केवळ तंत्रज्ञान आणि माध्यमच नाही तर राजकारणातही बदल घडवून आणत आहेत. जसजसे सरकार कमकुवत होत आहेत, तसतसे कंपन्या सक्षम होत आहेत.
बहुतांश सरकारांनी स्वत:बद्दल एक गैरसमज करून घेतला आहे. तो म्हणजे त्यांना वाटते की, ते जनहितासाठी धोरण आखत आहेत. वास्तविक सरकारने हे काम बड्या सल्लागार कंपन्या, गुंतवणूकदार बँका, खासगी कंपन्यांकडे सोपविलेले आहे. आता सार्वजनिक क्षेत्र देखील खासगी झाले असून आपण केवळ मूक प्रेक्षक म्हणून वावरत आहोत. पण या स्थितीमुळे लोकशाही संपली असे म्हणता येणार नाही. मात्र व्यापार आणि ग्राहक यांच्यातील संंबंधाने त्याची बर्यापैकी व्याख्या बदलली आहे.
आजघडीला आपले जग हे खूपच असुरक्षित आहे. असमानता वाढली आहे. श्रीमंत श्रीमंत होत आहेत, गरीब हे आणखी गरीब. कोरोनाने अर्थव्यवस्थेची हानी केली आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षांत विषमता वाढली आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत नाही तोच युद्ध पेटले. यात चुकीचे धोरण, हवामान बदल आणि त्याला आटणार्या स्रोतांची जोड. परिणामी स्थलांतर वाढले आहे. या गोष्टी संताप आणि असुरक्षिततेला प्रोत्साहन देतात आणि नंतर लोकशाहीला द्वेष आणि धु्रवीकरणाच्या गोष्टीत अडकवून टाकतात.
केवळ गरीबच नाही तर श्रीमंत देखील फसवल्याची भावना व्यक्त करत आहेत. 1990 च्या दशकात जेव्हा आर्थिक सुधारणांचा प्रयत्न झाला तेव्हा गरीब अधिक चिंताग्रस्त झाले होते. त्यांना रोजगार गमावण्याची भीती होती. मुक्त व्यापार कराराच्या विरोधात शेतकर्यांनी निदर्शने केली. आज स्थिती बदलली आहे. आता नवीन अर्थव्यवस्थेमुळे श्रीमंत देशांतील मजूर बाहेर जात आहेत. ते शिक्षित, अभिजन वर्ग आणि तज्ज्ञांच्या विरोधात आहेत. कारण या वर्गाने परस्पर सहकार्यातून जगातील सेवेचा आणि आर्थिक अर्थव्यवस्थेचा लाभ उचलला.
या वर्गातील संघर्षाचा सर्वात वाईट परिणाम म्हणजे विचारांना नाकारले जात आहे. लोक हे प्रत्येक ज्ञानाला संशयातून आणि स्वार्थाने भरलेला मानत आहेत. आपण ज्या पद्धतीने जगात माहिती अणि व्यवसायिक व्यवस्था आणली, त्याचाच हा परिणाम आहे. फायद्याच्या गोष्टींकडे देखील संशयाने पाहिले जात आहे. जसे हवामान बदल. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या परत सत्तेवर येण्याबरोबर त्यांना विरोधही केला जात आहे.
हवामानाशी संबंधित घटना सातत्याने घडत आहेत. मात्र त्या थांबविण्यासाठी आपण पुरेसे उपाय योजत नाहीत. सामूहिक प्रयत्नातून यासंबंधी काम करणारा समाज आता दिसत नाही. बाकू येथे हवामान बदल परिषदेत श्रीमंत देशांनी मदत करण्याचे नाटक करणेही सोडून दिले आहे. त्यांनी केवळ समाधानासाठी क्लायमेंट फायनान्सची हमी दिली आहे. याच श्रीमंत देशांनी भूतकाळात प्रचंड प्रदूषण केलेले असताना ते गरीब देशांना सुनावत आहेत आणि तुम्ही तुमच्या समस्या सोडवाव्यात, असे सांगत आहेत.
जेव्हा जग परस्परावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करेल, तेव्हा सर्व देश समृद्ध होतील आणि सुरक्षित होतील असे गृहीत धरले होते. एकमेकांविरोधात युद्ध करणार नाहीत असे सांगण्यात आले. त्यांचे हित एकत्र काम करण्यातच आहे, असे वातावरण तयार केले गेले. परंतु कामगार आणि पर्यावरण सुरक्षेवरचा खर्च कमी करण्याच्या नावाखाली या उद्योगांना स्थलांतरित करण्यात आले. वाढत्या खर्चामुळे उत्पादन करणे देखील महाग होते. या कारणामुळे उद्योग अन्य ठिकाणी स्थानांतरित करण्यात आले आणि कार्बन इमिशन देखील. परिणामी चीन हा जगासाठी कारखाना झाला. आता जेव्हा जगाला ग्रीन एनर्जी हवी तेव्हा नवनवीन तथ्य समोर येत आहेत. हरित उत्पादनाचे प्रॉडक्शन आजही दुसर्या जगात प्रामुख्याने चीनमध्ये स्वस्त आहे.
ट्रम्प यांनी व्यापार युद्ध सुरू करत उद्योग मायदेशी आणण्याची हमी दिली आहे. मात्र त्यामुळे पर्यावरण आणि आर्थिक द़ृष्टिकोनातून खर्च वाढणार आहे. आज जग व्यापाराच्या आघाडीवर एकमेकांवर अवलंबून असताना त्याला वेगळे करणे शक्य नाही. हे पाऊल ‘लो कार्बन इकोनॉमी’च्या दिशेने होणार्या वाटचालीला अडथळा आणणारे आहे. म्हणून आपल्याला भविष्यासाठी नवीन योजना आणावी लागेल. अर्थात आपण जुन्या पद्धतीचाच अंगीकार करत पुढे जावू शकत नाहीत. अर्थात मागील चुकांत सुधारणा करत आपल्याला एक नवीन आणि चांगल्या भविष्यासाठी काम करावे लागेल.