Grand Vitara : मारूती सुझुकीची नवी एसयुव्ही ग्रँड विटारा लॉन्च

Grand Vitara : मारूती सुझुकीची नवी एसयुव्ही ग्रँड विटारा लॉन्च
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मारूती सुझुकीने तिच्या मध्यम आकाराची ग्रँड व्हिटारा कार लॉन्च केली आहे. भारतात या कारची १०.४५ लाखापासून किंमत सुरू होते. त्याचबरोबर मजबूत मध्यम आकाराच्या एसयुव्ही प्रकारातील मारूती सुझुकीची ही भारतातील पहिली कार आहे.

बुकिंग बाबत माहिती

नवीन ग्रँड विटारा (Maruti Suzuki Grand Vitara) या SUV चे प्री-बुकिंग 11 जुलै रोजी 11,000 रुपयांच्या टोकन रकमेवर याआधीच सुरू झाले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या एसयूव्हीचे अधिकृत लॉन्चिंग होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहे. कंपनीने दिलेल्या अहवालानुसार बुकींग झालेला हा आकडा 55000 च्या पुढे गेला आहे.

ग्रँड विटारा ही मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओमधील प्रमुख SUV आहे. भारतातील कार निर्मात्याचे हे पहिले मजबूत हायब्रिड उत्पादन असेल. एकूण ६ ट्रिम्समध्ये 10 वेगवेगळे प्रकारात ही कार उपलब्ध असेल. सिग्मा, डेल्टा, झेटा, झेटा+, अल्फा आणि अल्फा+ या ट्रिम्सवर 1.5-लीटर पेट्रोल आणि माइल्ड हायब्रीड पॉवरट्रेन 103 bhp पॉवर निर्माण करेल. यातील चार ट्रिम्सना मानक म्हणून 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. त्याच वेळी, डेल्टा ट्रिम आणि वरील सर्व ट्रिममध्ये 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध असेल.

इंजिन आणि मायलेज

मारुती सुझुकी ग्रँड विटारा दोन इंजिन पर्यायांमध्ये असेल. कंपनीच्या इतर कारमध्ये 1.5-लिटर बेसिक हायब्रिड इंजिन आहे. तर दुसरे टोयोटाच्या सहकार्याने विकसित केलेले नवीन 1.5-लिटर मजबूत हायब्रिड इंजिन आहे. बेसिक हायब्रिड इंजिन 100 PS पॉवर आणि 135 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. याचे मायलेज 21.11 kmpl आहे. मजबूत हायब्रीड इंजिन 115 पीएस कमाल पॉवर निर्माण करते आणि ते केवळ एका ई-सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल. मारुती सुझुकीचा दावा आहे की ती त्याच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक 27.97 kmpl चा मायलेज देईल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news