पुढारी ऑनलाईन डेस्क : वाहन उद्योगाशी संबंधित एक मोठी वृत्त आज (दि.२३) समोर आले. निसान, होंडा आणि मित्सुबिशी या जपानी दिग्गज कार कंपन्यांनी एकत्र येण्याची घोषणा केली आहे. संयुक्त कंपनीसाठी सामंजस्य करार झाला असून, निसान आणि होंडा यांनी मिळून सर्वात मोठी कार कंपनी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये टेस्ला आणि चीनी कार कंपनी बिल्ड युवर ड्रीम (BYD) सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करण्याची योजना म्हणून याकडे पाहिले जात आहे.
जपानमधील दिग्गज मोटार कंपनी होंडा आणि निसान यांच्यातील विलीनीकरण करार अस्तित्वात आल्यानंतर ही कंपनी जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटो कंपनी बनणार आहे. मित्सुबिशी मोटर्स कॉर्पोरेशन होंडा-निसान युतीमध्ये सामील होऊ शकते. तीन कंपन्यांमध्ये स्वतंत्र सामंजस्य करार झाला होता. जानेवारी 2025 च्या अखेरीस ते त्याच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून जागतिक ऑटोमोबाईल बाजारपेठेत निसान, होंडा आणि मित्सुबिशी या जपानी दिग्गज कार कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होती. अखेर याच चर्चेला पूर्णविराम देत, या तिन्ही कंपन्यांनी एकत्र येण्याची घोषणा केली आहे आणि संयुक्त होल्डिंग कंपनीसाठी सामंजस्य करार केला आहे. निसान आणि होंडा यांनी मिळून सर्वात मोठी कार कंपनी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मित्सुबिशी मोटर्ससह जपानी वाहन उत्पादक Honda Motor Co. आणि Nissan Motor Co. Ltd. यांनी सोमवारी जाहीर केले की, त्यांनी संभाव्य विलीनीकरणावर चर्चा सुरू करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये टेस्ला आणि चीनी कार कंपनी बिल्ड युवर ड्रीम (BYD) सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करण्याची योजना म्हणून याकडे पाहिले जात आहे.
कंपन्यांनी स्पष्ट केले आहे, या विलीनीकरणाचे लक्ष्य 30 ट्रिलियन येन (अंदाजे 16.30 लाख कोटी रुपये) ची वार्षिक विक्री आणि 3 ट्रिलियन येन (1.62 लाख कोटी रुपये) पेक्षा अधिक नफा प्राप्ती आहे. या तिन्ही कंपन्या जून 2025 पर्यंत चर्चेला अंतिम स्वरूप देण्याचा विचार करत आहेत. असा विश्वास आहे की ही होल्डिंग कंपनी ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यान्वित होऊ शकते. होल्डिंग कंपनीच्या लाँचसह Honda आणि Nissan या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स जुलै आणि ऑगस्ट 2026 च्या अखेरीस डिलिस्ट केले जातील. नंतर स्टॉक एक्स्चेंजवर त्यांची यादी करण्याची योजना आहे.
होंडा, निसान आणि मित्सुबिशी मिळून दरवर्षी सुमारे 8 दशलक्ष वाहनांचे उत्पादन करतील. टोयोटा मोटर कॉर्पोरेशन आणि फोक्सवॅगन एजी सारख्या जागतिक दिग्गजांशी स्पर्धा करू शकतील. या संयुक्त उपक्रमात होंडाचा प्रभाव सर्वाधिक दिसून येईल कारण ही या भागीदारीतील सर्वात मोठी कंपनी आहे. दुसरीकडे निसान कंपनीला हा करार आधार मानला जात आहे.
जॉइंट होल्डिंग कंपनी अस्तित्वात आल्यानंतर जागतिक ऑटोमोबाईल बाजाराला नवी दिशा देईल. सध्या टोयोटा आणि फोक्सवॅगन अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्या क्रमांकाची कंपन्या आहेत. आता होंडा-निसान एकत्र आल्याने स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. या संयुक्त उपक्रमांतर्गत नवीन तंत्रज्ञान, वाहन प्लॅटफॉर्म आणि डिझाइनवर काम केले जाणार आहे.संशोधन, विकास आणि ऑपरेशन एकत्र केले जाणार असल्याने कमी खर्चात वाहने तयार करणे देखील सुलभ होईल. त्याचा परिणाम वाहनांच्या किमतीवर तर दिसून येईलच पण त्यामुळे नफ्यातही वाढ होण्याची अपेक्षा आहे.
होंडा आणि निसान संयुक्त शेअर हस्तांतरणाद्वारे संयुक्त होल्डिंग कंपनी स्थापन करतील. ही Honda आणि Nissan या दोन्हींची मूळ कंपनी असेल. तथापि, हे प्रत्येक कंपनीच्या भागधारकांच्या सर्वसाधारण सभेत मंजूरी आणि संबंधित प्राधिकरणांकडून आवश्यक मंजूरी मिळवण्याच्या अधीन असेल.कंपन्यांनी एक टाइमलाइन प्लॅन देखील जारी केला आहे, निसानचे संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे की, "होंडा आणि निसानने व्यवसाय एकत्रीकरणावर विचार करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये समन्वय आहे. संशोधन केले जाईल, आम्हाला आशा आहे की ही योजना यशस्वी होईल."
होंडाचे संचालक तोशिहिरो मिबे म्हणाले, "ऑटोमोबाईल उद्योगातील बदलाच्या या वेळी, जे दर 100 वर्षांनी एकदा घडेल असे म्हटले जाते, आम्हाला आशा आहे की निसान आणि होंडा यांच्या व्यवसायाच्या एकत्रीकरणात मित्सुबिशी मोटर्सचा सहभाग मोठा होईल. आम्ही एक मजबूत संयुक्त उपक्रम सुरू करण्यात यशस्वी होऊ.
मित्सुबिशी मोटर्सचे संचालक, अध्यक्ष आणि सीईओ ताकाओ काटो म्हणाले, "ऑटोमोटिव्ह उद्योगातील बदलाच्या या युगात, निसान आणि होंडा यांच्यातील व्यावसायिक एकीकरण पूर्णपणे यशस्वी होण्याची अपेक्षा आहे. याचा मित्सुबिशी मोटर्सशी संबंधित व्यवसायांनाही फायदा होईल."