

स्मार्टफोन हा आजच्या काळात आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. पण जर हा फोन हरवला किंवा चोरीला गेला, तर चिंतेची बाब ठरू सकते. मात्र घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण काही सोप्या पद्धती वापरून आपण आपल्या हरवलेल्या फोनचा शोध घेऊ शकतो तेही एफआयआर न करता! या आहेत तीन सोप्या आणि प्रभावी पद्धती ज्यांनी तुम्ही हरवलेला फोन शोधू शकता किंवा त्याचा गैरवापर होण्यापासून रोखू शकता.
(Find My Device )
जर तुमच्या फोनमध्ये Google अकाउंट लॉग इन असेल, तर Find My Device या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनचे थेट रिअल-टाईम लोकेशन पाहू शकता.
Find My Device वेबसाइट ओपन करा दुसऱ्या फोनवर किंवा संगणकावर
किंवा त्याचे अॅप इन्स्टॉल करा
Google आयडीने लॉगिन करा आणि काही सेकंदात फोन कुठे आहे ते समजेल
जर फोनमध्ये इंटरनेट आणि लोकेशन ऑन असेल, तर तुम्ही फोन लॉक करू शकता किंवा रिंग देखील करू शकता
जर फोन चोरीला गेला असेल आणि त्याचा गैरवापर होण्याची भीती वाटत असेल, तर भारत सरकारच्या Central Equipment Identity Register (CEIR) पोर्टलवर तक्रार नोंदवा.
हा पोर्टल IMEI नंबरच्या आधारे देशभरात फोन ब्लॉक करतो. यामुळे चोर फोनमध्ये दुसरी सिम घालायचा प्रयत्न केला, तर पोलिसांना माहिती मिळू शकते.
फोन ब्लॉक करण्याची प्रक्रिया:
CEIR पोर्टल वर जा
Block Stolen/Lost Mobile पर्याय निवडा
एफआयआर आणि ओळखीच्या कागदपत्रांची कॉपी अपलोड करा
IMEI नंबर भरा आणि सबमिट करा
एकदा फोन मिळाल्यावर CEIR पोर्टलवरून फोन अनब्लॉक देखील करता येतो.
तुमच्या फोनमध्ये जे Google अकाउंट लॉगिन आहे तेच जर दुसऱ्या डिव्हाइसवरही असेल, तर त्या ईमेलद्वारे देखील तुम्ही फोनची लोकेशन पाहू शकता.
Google location history आणि account activity च्या माध्यमातून फोनची शेवटची लोकेशन पाहता येते.
Gmail अकाउंटमध्ये लॉगिन करा
Google Maps च्या Timeline मध्ये जाऊन पाहा फोन कुठे शेवटचे होते.
फोन हरवला तर काय लक्षात ठेवावे?
घाबरू नका, शांत राहा
वरील तीन पद्धतींपैकी कोणतीही वापरा
भविष्यासाठी फोनमध्ये लोकेशन चालू ठेवा आणि Google अकाउंट ऍक्टिव्ह ठेवा
या सोप्या ट्रिक्समुळे तुमचा स्मार्टफोन शोधता येईल