Drive in 2022 Pay in 2023 : ‘ही’ कार यावर्षी खरेदी करा, पुढच्‍या वर्षी पैसे द्या! होंडाची अनोखी फेस्टिव्हल स्किम

Drive in 2022 Pay in 2023 : ‘ही’ कार यावर्षी खरेदी करा, पुढच्‍या वर्षी पैसे द्या! होंडाची अनोखी फेस्टिव्हल स्किम
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीच्‍या दिवसांमध्‍ये नवनवीन वस्तू खरेदी केल्या जातात. कारप्रेमींमध्ये या दिवसांमध्ये नव्या ऑफर जाणून घेण्याची खूप इच्छा असते. नवी कार खरेदी करणारा प्रत्येकजण मार्केटमधील सर्वात चांगल्या ऑफरकडे लक्ष ठेऊन असतो. होंडा कंपनीने सध्या एक अशी ऑफर आणली आहे ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. Drive in 2022, Pay in 2023 म्हणजेच चालवा 2022 मध्ये आणि पैसे द्या 2023 मध्ये अशी ऑफर आहे

Drive in 2022, Pay in 2023 या खास ऑफरसाठी होंडा कंपनीने कोटक महिन्द्रा प्राईम लिमिटेडसाेबत (KMPL) भागीदारी केली आहे. या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट (M&S) कुणाल बहल (Kunal Behal) यांनी या स्किमबाबत माहिती दिली आहे. जास्तीत जास्त लोक या सुविधेचा फायदा घेतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

काही महिने ही कार चालवा आणि पेमेंट काही महिन्यांनी करा, कंपनीकडून असे सांगितले तर हे ऐकून प्रत्येक ग्राहकाचा कार खरेदी करणाचा उत्साह वाढेल, असेही ते म्‍हणाले.  '

काय आहे ऑफर?

 होंडा कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता एक दमदार ऑफर आणली आहे. सोमवारी ( ३, ऑक्टो) देशभरातील सर्व कार खरेदीदारांसाठी कंपनीने 'ड्राईव्ह इन 2022, पे इन 2023' ही फेस्टीव्ह जाहीर केली. 31 ऑक्टोबरपर्यत ही ऑफर सुरू राहणार आहे. 'ड्राईव्ह इन 2022, पे इन 2023' याचा अर्थ असा आहे की, 2022 मध्ये होंडाची कार चालवायची आणि पैसे 2023 ला द्यायचे आहेत.

कंपनीने दिलेल्या माहितीनूसार, होंडा सिटी (Honda City) आणि होंडा अमेझ ( Honda Amaze) या कारसाठी ही खास ऑफर आहे. ही ऑफर जाहीर केल्यानंतर याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 31 तारखेच्या आधी बुकिंग करून याचा फायदा कारप्रेमी घेऊ शकतात. Honda च्या 'Drive in 2022, Pay in 2023' ही ऑफर फायनान्स स्कीमशी संबंधित आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये फायनान्सवर Honda Amaze आणि Honda City यापैकी कोणतीही कार खरेदी केली तर 2023 च्या सुरूवातीपासून याचे हप्ते भरण्यास सुरवात करायचे आहे. कारच्या ऑन-रोड किमतीच्या 85 टक्क्यांपर्यंत वित्तपुरवठा पहिल्या तीन महिन्यांसाठी EMI-मुक्त असेल, तर चौथ्या महिन्यात नियमित EMI भरावा लागेल.

ही योजना देशातील सर्व अधिकृत Honda डीलरशिप आणि KMPL शाखांमध्ये उपलब्ध असेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. कंपनीचा असा विश्वास आहे की, या उपक्रमाद्वारे, होंडा कारच्या ग्राहकांना खरेदी करणे सुलभ होईल.

ग्राहकांना Honda City आणि Honda Amaze खरेदी करण्याची अनोखी संधी

Honda मार्केटिंग आणि सेल्सचे उपाध्यक्ष कुणाल बहल म्हणाले की, "कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडसोबतच्या या भागीदारीमुळे आमच्या ग्राहकांना त्यांची आवडती Honda City आणि Honda Amaze खरेदी करण्याची अनोखी संधी मिळाली आहे. अधिकाधिक ग्राहकांनी आमच्या होंडा कुटुंबात सामील होऊन या ऑफरचा लाभ घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news