MG Motor : ह्युंदाईच्या क्रेटाला ‘या’ नव्या कारचे तगडे आव्हान

MG Motor : ह्युंदाईच्या क्रेटाला ‘या’ नव्या कारचे तगडे आव्हान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ह्युंदाईच्या क्रेटाची (Hyundai Creta) ग्राहकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. अनेक कंपन्या क्रेटाच्या डिझाईनवर आधारित त्यांच्या नव्या कार ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आणत आहेत. सध्या एका नवी एसयुव्ही खूप चर्चेत आली आहे. एमजी मोटार (MG Motor) कंपनीची ही नवी कार असेल. २०२० मध्ये आलेल्या क्रेटा कंपनीला एमजी कंपनीची नवी एसयुव्ही आव्हान (Competitor) ठरेल अशी चर्चा आहे.

MG Motor बुधवार, 6 सप्टेंबर रोजी एक विशेष SUV लॉन्च करणार आहे. कंपनीने अधिकृत लॉन्चपूर्वी Astor च्या ब्लॅक एडिशनची झलक दिली आहे. या नव्या 'एसयुव्ही'चे ॲस्टर ब्लॅक व्हेरिएंट (Astor SUV) असे नाव आहे. 'एमजी'ची नवी कार ह्युंदाईच्या क्रेटा कारला (Hyundai Creta Competitor) टक्कर देणार आहे. त्यामुळे कारचाहत्यांमध्ये आता भारतीय बाजारपेठेत या नव्या मॉडेलची क्रेझ वाढणार अशी चर्चा आहे.

'या' कार मॉडेल ॲस्टर कारची स्पर्धा

स्पेशल एडिशन Astor ही कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये असेल. यावर्षी मेमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या Gloster Blackstorm व्हेरियंट सारखीच ही नवी कार असेल. हे कार मॉडेल Hyundai Creta Night Edition, Kia Seltos X Line आणि Skoda Kushaq Matte Edition या कंपन्यांशी स्पर्धा करेल.

एमजी एस्टर ब्लॅक एडिशन एक्सटीरियर

MG Astor या एसयूव्हीच्या टॉप-स्पेक सॅव्ही ट्रिमवर आधारित असेल, अशी चर्चा आहे. याचे डार्क एडिशन ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्म एडिशन सारख्या ऑल-ब्लॅक थीमसह पहायला मिळेल. कारमेकर एस्टोरच्या विशेष प्रकारांवर स्टारी ब्लॅक एक्सटीरियर कलर थीम असेल. प्रीमियम लूकसाठी, याला एसयूव्हीभोवती अनेक क्रोम गार्निश मिळतील. स्पोर्टी कॅरेक्टर हायलाइट करण्यासाठी फ्रंट ग्रिल आणि अलॉय व्हील्सला चमकदार काळा, क्रोम आणि लाल रंगाची थीम पहायला मिळेल अशी चर्चा आहे. या SUV वरील ब्लॅक एडिशन बॅजिंग हे मानक प्रकारापेक्षा वेगळे असेल, अशी अपेक्षा अनेक कार चाहत्यांकडून व्यक्त केल्‍या जात आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news