

Weekly Horoscope | होराभूषण रघुवीर खटावकर : हा सप्ताह मिथुन, तूळ, वृश्चिक, मीन राशिगटाला उत्तम; तर वृषभ, कन्या, मकर राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. महत्त्वाचे गृहयोग : दि. ८ - रवि प्रतियुती शनि, बुध षडाष्टक नेपच्यून, बुध षडाष्टक प्लुटो, ११ - शुक्र षडाष्टक शनि, १२ - रवि केंद्र गुरू, बुध लाभ मंगळ. वक्री ग्रह : शनि, नेपच्यून, प्लुटो, हर्षल.
मेष : रवि बुध पाचवे. साहित्य, क्रीडा, बौद्धिक, शैक्षणिक, कला क्षेत्रात आघाडी घ्याल. पण मनाची कुचंबणा होईल. कायमस्वरूपाची नोकरी लाभेल. विवाह जुळेल. आरोग्य सुधारेल. परदेशगमन घडेल. सप्ताहाच्या सुरुवातीला सहकार्याचे वातावरण लाभेल. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी कामाचे समाधान लाभेल.
वृषभ : रवि बुध चौथे. प्रॉपर्टीच्या समस्या समजुतीने सोडवण्याचा प्रयत्न राहील. जामीन राहू नका. भागीदारीच्या व्यवहारातून फायदा होईल. परदेशगमनाची संधी येईल. प्रलोभने टाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल. पण श्रेय कमी मिळेल. एक-दोन दिवस सहकार्याचे जातील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल वाढेल.
मिथुन : रवि बुध तिसरे. साहित्य, क्रीडा, कला क्षेत्रात यश मिळेल. परदेशगमनाची संधी लाभेल. प्रॉपर्टीत गुंतवणूक कराल. शत्रू वाढतील. कायदेशीर बाबी सांभाळा. भावंडांना त्रास संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीचा सहवास लाभेल. कामात यश मिळेल, पण मोबदला कमी मिळेल. एक-दोन दिवस सहकार्याचे जातील. सप्ताहाच्या शेवटी मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल.
कर्क : रवि बुध दुसरे. आर्थिक प्राप्ती कष्टाने जेमतेम राहील. पण चांगल्या अधिकाराची नोकरी मिळू शकेल. जामीन राहू नका. विवाह जुळेल. शिक्षणात घोडदौड चालू राहील. विलंब, त्रास अनुभवाल. भावनावेग आवरा. सप्ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थीत पुढाकार घ्याल. संततीवर प्रेम कराल. कामात यश मिळेल. तरी श्रेय कमी मिळेल. सप्ताहाच्या शेवटी कामासाठी प्रवास घडेल.
सिंह : रवि बुध पहिले. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महत्त्वाकांक्षी बनाल. धंद्यात चैतन्य आणाल. कुटुंबातील सर्वांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. प्रॉपर्टीची कामे होतील. उधारी वसुलीची काळजी कराल. सामाजिक कार्यातून लाभ होईल. सप्ताहाच्या सुरुवातीची धावपळ, प्रवास कामात यश मिळवून देईल. घरगृहस्थी, प्रॉपर्टीच्या कामात त्रास संभवतो. संततीचा सहवास लाभेल. शेवटी यश मिळेल. पण श्रेय मिळणार नाही.
कन्या : रवि बुध १२ वे. अत्यावश्यक खर्च वाढेल. मित्रासाठी खर्च कराल. खर्चिक बनाल. प्रयत्नात त्रुटी राहतील. परदेशगमन, प्रवास घडेल. भावनिक दडपण राहील. पूर्वग्रहदूषित राहाल. सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबाच्या गरजा भागवाल. गाठीभेटी, प्रवास?इ.मुळे यश मिळेल. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. सप्ताहाच्या शेवटी संततीचा सहवास लाभेल.
तूळ : रवि बुध ११ वे. बुद्धिकौशल्याने मोठे आर्थिक लाभ होतील. मित्रामुळे अडचणीत याल. भावंडांशी वाद टाळा. भावनिक दडपण राहील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रयत्नांनी यश मिळवाल. कौटुंबिक गरजा भागवाल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास इ.साठी खूप धावपळ होईल. सप्ताहाच्या शेवटी घरगृहस्थीत पुढाकार घ्याल.
वृश्चिक : रवि बुध १० वे. कार्यक्षेत्रात प्रगती होत राहील. यश मिळेल. विवाह जुळेल. खरेदी-विक्री वाढेल. घरातील वृद्धांची काळजी घ्या. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी होईल. कामे रेंगाळली तरी पुढील दोन दिवसांत पूर्ण कराल. कौटुंबिक गरजा भागवाल. सप्ताहाच्या शेवटी गाठीभेटी, प्रवास इ.साठी धावपळ होईल.
धनु : रवि बुध नववे. भाग्यकारक अनुभव येईल. कर्माला भाग्याची जोड लाभेल. पण दुर्लक्ष झाल्यास धंद्यात नुकसान होऊ शकेल. भावनिक दडपण राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभाच्या घटना घडतील. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे दोन दिवसांत पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल.
मकर : रवि बुध आठवे. धंद्यात मंदी जाणवेल. पण तुमची विश्वासार्हता टिकून राहील. विपरीत घटनेतून विवाह जुळेल. शैक्षणिक प्रगती चालू राहील. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. विलंब, अडचणी जाणवतील. सप्ताहाची सुरुवात उत्साहाने होईल. यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. खर्च वाढेल. कामे रेंगाळतील. शेवटी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न राहील.
कुंभ : रवि बुध सातवे. महत्त्वाकांक्षी, पण अहंकारी बनाल. गुप्त कारस्थानांचा त्रास संभवतो. विलंब, अडचणी त्रास जाणवेल. निर्णायक कामात यश मिळेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. एक-दोन दिवस आर्थिक लाभ होतील. शेवटी खर्च वाढेल. मनोबल कमी राहील.
मीन : रवि बुध सहावे. कर्म बलवान राहील. बुद्धिकौशल्याने यश मिळेल. संधी मिळेल. भावनिक दडपण राहील. जवळच्या व्यक्तींचा विरह जाणवेल. अत्यावश्यक खर्च वाढेल. विलंब, त्रास अनुभवाल. प्रॉपर्टीची कामे होतील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. मनोबल वाढेल. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक घटना घडतील.