Weekly Horoscope | होराभूषण रघुवीर खटावकर : हा सप्ताह मिथुन, तूळ, वृश्चिक, मीन राशिगटाला उत्तम; तर वृषभ, कन्या, मकर राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश-दि. ४-बुध सिंहेत ११/४१. महत्त्वाचे ग्रहयोग-दि. ३-मंगळ केंद्र नेपच्यून, दि.४-मंगळ षडाष्टक प्लूटो, दि. ७-बुध केंद्र हर्षल. वक्री ग्रह-शनी, नेपच्यून, प्लूटो, दि. १-हर्षल वक्री.
मेष : रवी, बुध ५ वे. पूर्वसुकृत व सेवा यांचा लाभ होईल. भाग्य बलवान राहील, तरीही मनाची कुचंबणा होईल. सुवर्णालंकार लाभतील. विवाह जुळेल. कायम स्वरूपाची नोकरी मिळेल. कुपथ्य करू नका. सप्ताहाची सुरुवात चिडचिडीने होईल. घरगृहस्थी व संततीच्या बाबतीत समजुतीने वागाल. सप्ताहाशेवटी कामे होतील. श्रेय कमी मिळेल.
वृषभ : रवी, बुध ४ थे. शिक्षणामुळे चांगल्या अधिकाराची नोकरी मिळेल. प्रॉपर्टीची कामे होतील. कुटुंबात मनमानी कराल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. विवाह जुळेल. आर्थिक प्राप्ती होईल. संततीवर प्रेम राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला भावंडांचे सुख लाभेल. घरगृहस्थी, हाऊसकिपिंगला प्राधान्य द्याल. संततीच्या समस्यांकडे लक्ष द्याल. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. शेवटी कामात यश मिळेल.
मिथुन : रवी, बुध ३ रे. धाडसी कामाचे कौतुक होईल. विकासासाठी नवीन योजना राबवाल. घरीदारी शत्रू वाढतील. भावनावेग आवरा. कायदेशीर बाबी सांभाळा. भावंडांना त्रास संभवतो. भाग्यकारक अनुभव येईल. परदेशगमन घडेल. सप्ताहात कुटुंबाच्या गरजा भागवाल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास इ. धावपळीत जातील. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. संततीसाठी शिक्षणाची सोय कराल.
कर्क : रवी, बुध २ रे. चांगल्या अधिकाराची नोकरी मिळेल. कष्टाशिवाय काही मिळणार नाही. भाऊबंदकी जाणवेल. भावनावेग आवरा. कानाचे-डोळ्यांचे विकार जाणवतील. विश्वासार्हता राहील. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. कुटुंबाच्या गरजा भागवाल. एक-दोन दिवस खूप धावपळ करून यश मिळवाल. घरगृहस्थीकडे लक्ष द्याल.
सिंह : रवी, बुध १ ले. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महत्त्वाकांक्षी राहाल. मित्राची मदत होईल. प्रॉपर्टीची कामे होतील. शारीरिक व्याधी जाणवेल. पित्ताचा त्रास होईल. बोलण्याने कामे बिघडू शकतील. कामाची गुणवत्ता वाढवा. सप्ताहाची सुरुवात अत्यावश्यक खर्चाने होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. कुटुंबातील समस्या जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी यश मिळेल; पण धावपळ होईल.
कन्या : रवी, बुध १२ वे. अत्यावश्यक खर्च वाढेल. प्रयत्नात त्रुटी राहतील. सामाजिक कार्यातून लाभ होईल. कामासाठी प्रवास घडेल. आई-वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक घटना घडतील. मित्रांच्या समवेत करमणुकीत वेळ जाईल. एक-दोन दिवस खर्च वाढेल. चिडचिड होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल.
तूळ : रवी, बुध ११ वे. मोठे आर्थिक लाभ होतील. मित्रामुळे अडचणीत येऊ शकाल. कामासाठी प्रवास घडेल. नातेवाईकांची सरबराई करावी लागेल. कामे यशस्वी होतील. भावनिक दडपण राहील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात समाधान लाभेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. एक-दोन दिवस खर्चाचे, चिडचिडीचे जातील. रेंगाळलेली कामे सप्ताहाच्या शेवटी पूर्ण कराल
वृश्चिक : रवी, बुध १० वे. खरेदी-विक्री वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता निर्माण होईल. सामाजिक कार्यातून लाभ होईल. विपरीत घटनेतून लाभ होईल. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यकारक अनुभव येईल. विवाह जुळेल. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढेल. चिडचिड होईल.
धनु : रवी, बुध ९ वे. कर्माला भाग्याची जोड लाभेल. मोठे यश मिळेल. कामाचे नियोजन, चिकाटी चांगली राहील. धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यास मोठे नुकसान संभवते. अधिकार नीट चालणार नाहीत. सप्ताहाच्या सुरुवातीला थकवा जाणवेल. मनोबल वाढेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. सामाजिक कार्यातून लाभ होईल. सप्ताहाच्या शेवटी कमी श्रमात लाभ होतील
मकर : रवी, बुध ८ वे. धंद्यात स्पर्धा राहील; पण विश्वासार्हता टिकवून ठेवाल. सुवर्णालंकारांची प्राप्ती होईल. संततीचा खर्च अनाठायी होईल. धार्मिक कृत्ये कराल. प्रशिक्षणासाठी निवड होईल. विलंब, अडचणी अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला सहकार्य लाभेल. सर्दी, पडसे, शारीरिक त्रास जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी कार्यसाफल्याचा आनंद मिळेल
कुंभ : रवी, बुध ७ वे. महत्त्वाकांक्षी राहाल; पण भावनिक आव्हाने समोर असतील. आंतरजातीय विवाहास अनुकूलता लाभेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. अचानक धनलाभ संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल; पण श्रेय कमी मिळेल. यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील. एक-दोन दिवस सर्दी, पडसे जाणवेल. मनोबल कमी राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा
मीन : रवी, बुध ६ वे. कामात यश मिळत राहील. आव्हानात्मक कामे करावी लागतील. जवळच्या व्यक्तींचा विरह जाणवेल. पोटाची तक्रार जाणवेल. प्रॉपर्टीची कामे होतील. विलंब, अडचणी अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला संतती सौख्य लाभेल. कामात यश मिळेल. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. सप्ताहाच्या शेवटी इतरांच्या सहकार्याने यश मिळेल. भावनिक दडपण राहील.