[author title="चिराग दारूवाला : " image="http://"][/author]
चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
श्रीगणेश म्हणतात की, हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्यदायी असेल. मित्रांबरोबर संवाद साधाल मनोरंजनात वेळ
व्यतित कराल. रिअल इस्टेट किंवा मागील गुंतवणुकीमुळे भरीव परतावा मिळू शकतो. करिअर किंवा व्यवसायाचा विचार करता, तुम्ही अविचारी निर्णय घेणे नुकसानकारक ठरेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आर्थिक प्राप्ती चांगली असल्यास तुम्ही जोखीम घेण्यास अधिक इच्छुक असाल.
तुम्ही विविध क्षेत्रातील शक्य तितके ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न कराल. आरोग्यात सुधारणा होईल;पण कोणता आहार घेत आहात यावर लक्ष ठेवा, असा सल्ला श्रीगणेश देतात. खाण्याकडील दुर्लक्षामुळे भविष्यात आरोग्यासाठी हानीकारक ठरु कशते. जंक फूड कोणत्याही परिस्थितीत टाळल्यास तुमच्या फिटनेसला फायदा होईल.
श्रीगणेश सांगतात की, हा आठवडा नातेसंबंधांसाठी सामान्य आठवडा राहिल. प्रिय व्यक्तीबरोबर वेळ व्यतित कराल. ताणतणाव, अतिचार आणि आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी योग्य आहार, विश्रांती, व्यायामाबरोबर ध्यान करा. तुमचा दिनक्रमच तुमच्या प्रगतीवर परिणाम करेल. मागील गुंतवणुकीवर संभाव्य परतावा. कायदेशीर आणि वैद्यकीय व्यावसायिकांना विलंब होऊ शकतो.
या आठवड्यात तुमचा जोडीदार तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी व्यायामाला प्राधान्य द्या. या आठवड्यात तुम्हाला डोकेदुखी किंवा हात दुखत असल्यास आवश्यकतेनुसार विश्रांती घ्या. आपण स्वत: वर उपचार करू शकता. आर्थिक प्राप्ती चांगली असेल.
प्रगतीसाठी उत्कृष्ट संधी मिळू शकतील. योग्य आर्थिक व्यवस्थापन आणि सकारात्मक विचार तुम्हाला आठवड्याच्या उत्तरार्धात फायदेशीर ठरतील. भूतकाळाच्या स्मरणामुळे नात्यात विनाकारण अडथळे येऊ शकतात. समस्यांना सामोरे जाण्यासाठी चातुर्य वापरा.आरोग्य ठीक राहिल.
या आठवड्यात एखादे काम पूर्ण झाल्याने मानसिक समाधान लाभेल. नवीन उपक्रम सुरू करण्याबाबत विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे. विवाह इच्छूक जोडीदार निवडीबाबत पालकांशी चर्चा करतील. आठवड्याच्या सुरुवातीला काही चिंता सतावेल. मात्र उर्वरित आठवड्यात यावर तोडगा निघाल्याने दिलासा मिळेल, असे श्रीगणेश सांगतात.
श्रीगणेश म्हणतात, या आठवड्यात अनावश्यक वाद टाळा. आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी व्यस्त दिनक्रमातून थोडा वेळ व्यतित करा. तसेच मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नकारात्मक विचार टाळा. गुंतवणूक करण्यास काळ अनुकूल नाही. कौटुंबिक खर्चामध्येही वाढ होऊ शकते. कुटुंब किंवा मालमत्तेबाबत निर्णय घेण्यासाठी हा आठवडा योग्य नाही.
हा आठवडा रोमँटिक जीवनात खूप आनंद देईल. पती-पत्नीचे नाते मधूर होईल. विद्यार्थ्यांच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा होईल. तरीही त्यांना मोठ्या अपेक्षांचा सामना करावा लागेल. वातावरण सामान्यतः अनुकूल असेल, असे श्रीगणेश सांगतात. मात्र आरोग्याबाबत चढ-उतार अनुभवाल. अपचनाचा त्रास होऊ शकतो.
श्रीगणेश म्हणतात, जनसंपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभही होईल. व्यावसायिकांनी त्यांच्या समवयस्कांचा सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नये. कामकाजात साप्ताहिक बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वैवाहिक संबंधांसाठी हा आठवडा लाभदायक ठरणार नाही. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता. विसंवाद टाळा. अनपेक्षित वैद्यकीय खर्च होऊ शकतो. गूढ विज्ञान तुमची आवड निर्माण करू शकते. विद्यार्थ्यांना यश लाभेल.
श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात तुमच्या नात्यात काही गैरसमज होऊ शकतात. खर्च वाढू शकतात; परंतु तुम्हाला पूर्वीच्या गुंतवणुकीतून फायदा होईल. सोमवारी सहकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता. व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक नियोजनावर भर असेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचाही विचार कराल.
हा आठवडा तुमच्यासाठी विलक्षण असेल. नवीन बदल तुमच्यसाठी अनुकूल असतील. मेहनतीला यश मिळेल. दिनचर्येत बदल करु नका. आरोग्य चांगले राहिल. खर्चावर नियंत्रण ठेवा, असा सल्ला श्रीगणेश देतात.
श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात कार्यस्थळी आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. निराशावादी विचारांना थारा देवू नका. सकारात्मक विचारांच्या सहाय्याने परिस्थिती नियंत्रण ठेवा. मुलांची कोणतीही गंभीर चिंता दूर होईल. तुमच्या क्षमतेनुसार काही महत्त्वाचे निर्णय घ्या, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.