Weekly Horoscope: मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात अपेक्षेप्रमाणे सर्व लाभ होणार; तुमचा आठवडा कसा जाणार?

Weekly Horoscope in Marathi: साप्ताहिक राशिभविष्य ८ ते १४ मार्च, २०२६ जाणून घ्या तुमचा आठवडा कसा जाईल?
Weekly Horoscope
Weekly Horoscopefile photo
Published on
Updated on

Weekly Horoscope

हा सप्ताह मेष, वृषभ, कन्या, धनु राशिगटाला उत्तम, तर कर्क, वृश्चिक, मीन राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश : दि. १४ रवी मीनेत २५/०२. वक्री ग्रह बुध, दि. ११ पर्यंत गुरू. अस्तंगत ग्रह: मंगळ, दि. १२ पर्यंत बुध, दि. १२ पासून शनी. महत्त्वाचे ग्रहयोग: दि. ८- शुक्र युती शनी, दि. ९-बुध त्रिकोण गुरू, शुक्र लाभ प्लुटो.

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

र.म.बु.रा. ११ वे. बक्षिसे मिळवाल. अपेक्षेप्रमाणे सर्व लाभ होत राहतील. विवाह जुळेल. मित्र तुमच्या विचाराने प्रभावित होतील. जवळच्या व्यक्तींचा विरह जाणवेल. प्रगतीत अडचणी, विलंब, त्रास अनुभवाल. सप्ताहात सहकार्याने यश मिळेल. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी कार्यसाफल्याचा आनंद मिळेल.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

र.म.बु.रा. १० वे अधिकार राहतील. कामात जोडीदाराची मदत होईल. वडिलार्जित इस्टेटीचा लाभ संभवतो. कायम स्वरूपाची नोकरी मिळेल. अपेक्षापूर्ती, कर्जफेडीस अनुकूलता लाभेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. वाद टाळा. इतरांचे सहकार्य लाभेल. विवाह जुळेल. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

र.म.बु.रा. ९ वे. विपरीत बुद्धी होईल. तुमच्या भाग्यात भावंडांचा वाटा राहील. प्रशिक्षणासाठी परदेशगमनाची मिशन संधी लाभेल. विवाह जुळेल. धंदा, व्यवसाय, नोकरीत गोंधळाचे वातावरण राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला शिक्षणासाठी पैशाची सोय करा. हाताखालील व्यक्तीवर फार विसंबून राहू नका. सहकार्याचे वातावरण राहील. शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

र.म.बु.रा. ८ वे. खर्च हाताबाहेर जाईल. कायदेशीर बाबीमुळे अडचणीत येऊ शकाल; पण विपरीत घटनेतून कर्क लाभ संभवतो. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. पर्यटन परदेशगमनाची संधी येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थीत पुढाकार घ्याल. संततीवर प्रेम व आत्मविश्वास राहील. अपेक्षेप्रमाणे कष्टाचा मोबदला मिळणार नाही; पण कामे होतील. इतरांची मदत मिळेल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

र.म.बु.रा. ७ वे. कामासाठी प्रवास घडेल. भावनिक दडपण सिद्ध असले, तरी सहकार्य लाभेल. कौटुंबिक खर्च वाढेल. अचानक धनलाभ संभवतो. विवाह जुळेल. गुरुकृपा राहील. अडचणी विलंब, अडचणी अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी, प्रवास व अन्य प्रयास यश मिळवून देतील. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. संततीसुख लाभे. शिक्षणातील अडचणी दूर होतील. मोबदला कमी मिळेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

र.म.बु.रा. ६ वे. कधी कमी श्रमात, कधी बुद्धिकौशल्याने आग्रही स्वभावामुळे, तर कधी विपरीत घटनेतूनही यश व लाभ मिळेल. भावनिक दडपण राहील. घरगृहस्थी धनलाभास मदत होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागवाल. गाठीभेटी, प्रवास इ. प्रयत्न यश मिळवून देतील. घरगृहस्थीचे सौख्य मिळेल. संततीचा सहवास लाभेल.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

र.म.बु.रा. ५ वे. मनाची कुचंबणा होत राहील. मित्रांच्या विचारांचा प्रभाव तुमच्यावर राहील. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. स्पर्धकांचा अंदाज घ्या. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. परदेशगमन घडेल. सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. कुटुंबाच्या गरजा भागवाल. गाठीभेटी, प्रवास इ. मुळे कामात यश मिळेल. भावंडांचे सुख मिळेल. घरगृहस्थीसाठी वेळ द्याल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

र.म.बु.रा. ४ थे. घरगृहस्थीच्या काळजीने मधूनमधून मन उदास होईल. प्रॉपर्टीची कामे होतील. भावनिक दडपण वृश्चिक राहील. शारीरिक तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. पोटाची तक्रार जाणवेल. सप्ताहाच्या सुरुवातीला खर्च वाढेल. रेंगाळलेली कामे पुढील एक-दोन दिवसांत पूर्ण करू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी कामात यश मिळेल. गाठीभेटी घ्या.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

र.म.बु.रा. ३ रे. नवीन कामे हाती घेण्याची क्षमता राहील. कामात यश मिळत जाईल. विचार जुळेल. कामात विलंब, अडचणी त्रास अनुभवाल. कामासाठी प्रवास घडेल. सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक घटना घडतील. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. कामे रेंगाळली, तरी एक-दोन दिवसांत पूर्ण करू शकाल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

र.म.बु.रा.२रे. कुटुंबात अशांतता अनुभवाल. बुद्धिकौशल्याने आर्थिक प्राप्ती होईल; पण जेमतेम. भावंडांशी वाद टाळा. कल्पनाशक्ती कामाचे नियोजन यश मिळवून देईल. शारीरिक व्याधी जाणवेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक मोबदला मिळेल. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. सप्ताहाच्या शेवटी उत्साहाने कामे पूर्ण कराल.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

र. म. बु. रा.१ ले. मानसिक संतुलन राखा. भावनिक दडपण येईल. कुटुंबात गैरसमज होतील. विलंब, अडचणी त्रास अनुभवाल. प्रवास घडेल. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी कामे बिघडतील. चिडचिड होईल. वेळ वाया जाईल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

र.म.बु.रा. १२ वे. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. अनेक प्रकारचे खर्च होतील. स्वतःच्या जोडीदाराच्या व सीन वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. कामात विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कार्यसाफल्याचा आनंद होईल. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक घटना घडतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news