

Weekly Horoscope
या सप्ताहपासून कर्क, तुळ, कुंभ, मीन राशिगटाला उत्तम, तर वृषभ, कन्या, मकर राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. महत्त्वाचे ग्रहयोग ः दि. 6-रवी युती बुध. दि. 8-रवी युती मंगळ, दि. 9-रवी युती मंगळ, दि. 10-रवी प्रतियुती गुरू, मंगळ प्रतियुती गुरू. वक्री ग्रह ः गुरू हर्षल. अस्तंगत ग्रह ः मंगळ, बुध, शुक्र.
रवी मं.शु.बु. 9 वे. भाग्य बलवान राहील. नातेवाईकांची ये-जा वाढेल. कर्माला भाग्याची साथ लाभेल. नावलौकिक वाढेल. भावंडाची जबाबदारी घ्यावी लागेल. अडथळे विलंब, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला गृहसौख्य लाभेल. संततीसौख्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी कामात यश मिळेल. धंद्यात खूप उलाढाली अनुभवाल.
रवी मं.शु.बु. 8 वे. अचानक धनलाभ संभवतो. विपरीत घटनेतून फायदा होईल. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. विवाह जुळेल. वृद्धांनी कुपथ्य करू नये. मुत्सद्दीपणा उपयोग येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल. प्रॉपर्टीच्या कामांना वेग येईल. गृहसौख्याची काळजी कराल. सप्ताहाच्या शेवटी शिक्षणातील अडचणी दूर होतील.
रवी मं.शु.बु.7 वे. कामासाठी प्रवास, परदेशगमन घडेल. तीर्थयात्रेचे योग येतील. भावनिक दडपण राहील. विवाह जुळेल. जुनाट विकार डोके वर काढू शकेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. सप्ताहाच्या सुुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. गाठीभेटी प्रवास संपर्काद्वारे कामात यश मिळवाल. सप्ताहाच्या शेवटी जमीन जुमला, प्रॉपर्टीची कामे होतील.
रवी मं.शु.बु. 6 वे. गुप्त शत्रू असतील. बुद्धिकौशल्याने अडचणींवर मात कराल. कामात यश मिळवाल. स्पर्धकांचा अंदाज घ्या. विपरीत घटनेतून लाभ होईल. कायदेशीर बाबी सांभाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला चांगलेचुंगले खायला मिळेल. महत्त्वाकांक्षी बनाल. कौटुंबिक गरजा भागवाल. सप्ताहाच्या शेवटी गाठीभेटी, प्रवास इ. धावपळ करून यश मिळवाल.
रवी मं.शु.बु. 5 वे. कला, क्रीडा, साहित्य, बौद्धिक क्षेत्रात अतिआत्मविश्वास राहील; पण मनाची कुचंबणा होईल. संततीवर प्रेम राहील. शिक्षणात प्रगती राहील. विवाह जुळेल. विपरीत घटनेतून लाभ होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला आवश्यक खर्च वाढेल. खर्चिक बनाल. भावनिक दडपण येईल; पण कामात यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी अनावश्यक खर्च होईल.
रवी मं.शु.बु.4 थे. घरगृहस्थीत पुढाकार घ्याल. प्रॉपर्टीची कामे, वाहन खरेदी इ. कामे म्हणजे अडथळ्यांची शर्यत राहील; पण विपरीत घटनेतून ही शर्यत जिंकाल. काळजी कराल. सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक घटना घडतील. एक-दोन दिवस कामे रेंगाळतील. सप्ताहाच्या शेवटी यश मिळेल. मिष्टान्नाचा लाभ होईल.
रवी मं.शु.बु.3 रे. प्रयत्न मोठे यश, लाभ मिळवून देतील. सर्जनशील राहाल. स्वत:ला सिद्ध कराल. काहींना दिगंत कीर्ती मिळेल. विपरीत घटनेतून लाभ होतील. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचे समाधान मिळेल. आर्थिक मोबदला मिळेल. सप्ताहाच्या शेवटी कामाचा वेळ वाया जाईल. विवाह जुळेल.
रवी मं.शु.बु.2 रे. विपरीत घटनेतून सरकारी नोकरीतून लाभ होईल; पण प्राप्ती जेमतेम राहील. जामीन राहू नका. घर-कुटुंबात मतभेद अनुभवाल. जोखीम पत्करू नका. भावनिक दडपण येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यकारक अनुभव येईल; पण मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. कामात यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी कामाचा मोबदला मिळेल.
रवी मं.शु.बु.1ले. भाग्यकारक अनुभव येतील; पण मानसिक संतुलन राखा. विवाह जुळेल. कर्माला भाग्याची जोड लाभेल. आर्थिक प्राप्ती होईल. पोटाचा विकार जाणवेल. वृद्धांची प्रकृती सांभाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध जास्त जबाबदारीचे काम करावे लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी सामाजिक कार्यातून लाभ होईल.
रवी मं.शु.बु. 12 वे. अनेक प्रकारचे खर्च निघतील. विपरीत घटनेतून संभवतो. नियोजन कामी येईल. भावंडांशी वाद टाळा. विचार क्रांतिकारक राहतील. कुटुंबाबद्दल अधिक आसक्ती राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला कामासाठी प्रवास घडेल. भागीदारीत सुसंवाद राहील. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांच्या सूचना पाळा. प्रवास घडेल.
रवी मं.शु. बु. 11 वे. पुरस्कार मिळतील. कामाचे कौतुक होईल. विवाह जुळेल. श्रीमंत स्थळ मिळेल. विपरीत घटनेतून लाभ होईल. आक्रमकता टाळा. विलंब, अडचणी, त्रासही अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. धार्मिक कृत्ये कराल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. विपरीत घटनेतून लाभ संभवतो.
रवी मं.शु.बु.10 वे. कर्माला भाग्याची जोड लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील; पण अडचणी, त्रास, विलंब अनुभवाल. निर्णायक कामात यश मिळेल. गैरसमज, गोंधळ टाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला शैक्षणिक बाबी मार्गी लागतील. कामात यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी भावनिक दडपण येईल.