

Weekly Horoscope
हा सप्ताह दि. 14 पर्यंत कर्क, तूळ, कुंभ, मीन राशिगटाला उत्तम, तर वृषभ, कन्या, मकर राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. दि. 14 नंतर मेष, सिंह, वृश्चिक, मीन राशिगटाला उत्तम, तर मिथुन, तूळ, कुंभ राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश ः दि. 12- शुक्र मकरेत 27/58, दि. 14-रवी मकरेत 15/06, दि. 15-मंगळ मकरेत 28/26, दि. 17-बुध मकरेत 10/24. महत्त्वाचे ग्रहयोग ः दि. 14-बु. प्र. गु. दि. 15-शु. ला. श. शुक्र त्रिकोण, हर्षल, दि. 17-रवी लाभ शनी, रवी त्रि, हर्षल, शुक्र लाभ नेप. वक्रीग्रह ः गु. ह. अस्तंगत ग्रह- मं. बु. शु.
र. प्लु. शु. मं. दि. 14 नंतर ब 10 वे. सत्तासामर्थ्यात अस्थिरता जाणवेल. नावलौकिक वाढेल; पण अडचणी, विलंब, त्रास जाणवेल. अधिकार नीट चालणार नाहीत. विवाह जुळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला इतरांच्या सहकार्याने कामे होतील. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी मनावर वरिष्ठांचे दडपण राहील.
र. प्लु. शु. मं. दि 14 नंतर 9 वे. भाग्य जास्त बलवान राहील. कामासाठी प्रवास होतील. विवाह जुळेल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. प्रशिक्षणासाठी परदेशगमनाची संधी लाभेल. प्रॉपर्टीची कामे होतील. सप्ताहाच्या सुरुवातीला कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. इतरांच्या सहकार्याने कामे होत राहतील. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. मनोबल कमी राहील.
र.प्लु.शु.मं. दि.14 नंतर 8 वे. भावंडांशी वाद टाळा. गुंतागुंतीची कामे करावी लागतील. सामाजिक कार्यातून लाभ संभवतो. परदेशगमनाची संधी लाभेल. विपरीत बुद्धी होईल. अचानक लाभ होतील. सप्ताहाच्या सुरुवातीला वरिष्ठांची मर्जी सांभाळा. नातेवाईकांची सरबराई करावी लागेल. अधिक जबाबदारीची कामे करावी लागतील. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक लाभाच्या घटना घडतील.
र. प्लु. शु. मं. दि. 14 नंतर 7 वे. भावनिक दडपण वाढेल. सरकारी कामासाठी खर्च होईल. कामासाठी प्रवास घडेल. परदेशगमनाची संधी लाभेल. शेतीच्या उत्पन्नातून लाभ होईल. कुटुंबात मतभेद जाणवतील. सप्ताहाच्या सुरुवातीला गृहसौख्य लाभेल. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल सुधारेल; पण मनावर वरिष्ठांचे दडपण राहील.
र. प्लु. शु. मं. दि. 14 नंतर 6 वे. संधी येतील; पण प्रखर विरोधातून यश मिळेल. सुवर्णालंकारांची खरेदी कराल. विवाह जुळेल. आर्थिक लाभ होतील. भावनिक दडपण राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला इतरांच्या सहकार्याने यश मिळेल. घरगृहस्थीची काळजी राहील. भावंडांची कामे जबाबदारीने कराल. संततीच्या खर्चाला आळा घाला.
र. प्लु.शु.मं. दि. 14 नंतर 5वे. कला, क्रीडा साहित्य क्षेत्रात मोठ्या उलाढाली होतील. सामाजिक क्षेत्रातून लाभ होईल. भावनिक दडपण राहील. घरगृहस्थीत मनाची कुचंबणा होईल. गुणवत्ता वाढवा. आग्रही राहाल. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागवाल. कामात यश मिळेल. प्रॉपर्टीची कामे होतील. घरात पुढाकार घ्याल.
र. प्लु. शु. मं. दि. 14 नंतर 4?थे. घरगृहस्थीची काळजी कराल. घरात पुढाकार घ्याल. वाहन प्रॉपर्टीची कामे होतील. शत्रूवर मात कराल. गुरुकृपा राहील. आर्थिक प्राप्ती होईल. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला उत्साह राहील. यश मिळेल. मिष्टान्नाचा लाभ होईल. कौटुंबिक गरजा भागवाल. प्रवास, गाठीभेटी इ.मुळे यश मिळेल.
र.प्लु.शु.मं. दि. 14 नंतर 3 रे. कर्माला भाग्याची जोड लाभेल. नवीन कामे हाती?घ्याल. यश मिळेल. सुवर्णालंकारांची खरेदी कराल. वडिलार्जित प्रॉपर्टीचा लाभ होईल. भावनिक दडपण राहील. शारीरिक तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला खर्च वाढेल. वेळ वाया जाईल. रेंगाळलेली कामे पुढील दोन दिवसांत पूर्ण कराल. शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल.
र.प्लु.शु.मं. दि. 14 नंतर 2 रे. आर्थिक लाभ होतील; पण ते कष्टाने होतील. जामीन राहू नका. बोलण्यामुळे माणसे दुखावली जाणार नाहीत, याची काळजी घ्या. विवाह जुळेल. कुटुंबात घरात गैरसमज होतील. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभाने होईल. एक-दोन दिवस खर्चाचे कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे सप्ताहाच्या शेवटी पूर्ण होतील.
र.प्लु.शु.मं. दि. 14 नंतर 1 ले. मनाचे संतुलन राखा. रागावर नियंत्रण ठेवा. प्रॉपर्टीची कामे होतील. नियोजन व कल्पनाशक्ती चांगले राहील. विपरीत घटनेतून लाभ होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात जोडीदाराची मदत होईल. आर्थिक मोबदला मिळेल. मित्र भेटतील. सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढेल. कामाचा वेळ वाया जाईल.
र.प्लु.शु.मं. दि. 14 नंतर 12 वे. अनेक प्रकारचे खर्च उद्भवतील. आर्थिक लाभही होतील. धंद्यात स्पर्धेचे वातावरण राहील. शिक्षणात लक्षणीय प्रगती होईल. मित्रामध्ये प्रिय व्हाल. गुरुकृपा राहील; पण अडचणी, विलंब, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामे होतील; पण अधिकार नीट चालणार नाहीत. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक लाभ होईल.
र.प्लु.शु.मं. दि. 14 नंतर 11 वे. अनेक मार्गांनी अनेक प्रकारचे लाभ होतील. स्वभाव खर्चिक बनेल. मन संशयी बनेल. तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतील. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. विपरीत घटनेतून लाभ होतील. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. मनोबल कमी राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. शिक्षणासाठी प्रवास होईल. सप्ताहाच्या शेवटी कामात यश मिळेल.