Weekly Horoscope: फेब्रुवारीचा पहिला आठवडा तुमच्या राशीसाठी कसा असेल? जाणून घ्या ग्रह-ताऱ्यांची स्थिती

Weekly Horoscope in Marathi: साप्ताहिक राशिभविष्य 1 ते 7 फेब्रुवारी 2026, जाणून घ्या तुमचा आठवडा कसा जाईल?
Weekly Horoscope
Weekly Horoscopefile photo
Published on
Updated on

Weekly Horoscope

हा सप्ताह मेष, सिंह, वृश्चिक, मीन राशिगटाला उत्तम, तर मिथुन, तूळ, कुंभ राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. दि. 3 बुध कुंभेत 21/52, दि. 5-शुक्र कुंभेत 21/11. महत्त्वाचे ग्रहयोग-दि. 5 रवी षडाष्टक गुरू, बुध केतू हर्षल. वक्री ग्रह- गुरू, दि. 4 पर्यंत हर्षल. अस्तंगत ग्रह- मंगळ, दि. 4 पर्यंत बुध अस्तंगत.

मेष : मोठे अधिकार प्राप्त होतील

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मं.र.प्लू.10 वे. मोठे अधिकार प्राप्त होतील. कामात यशही मिळेल. बक्षीस मिळवाल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. अनाकलनीय खर्च उद्भवेल. विवाह जुळेल. नावलौकिक वाढेल. सप्ताहाच्या सुरुवातीला गृहसौख्य लाभेल. रिकाम्या उठाठेवी अंगलट येऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी कष्टाच्या मानाने लाभ होईल; पण कामात यश मिळेल.

वृषभ : धार्मिक कार्यासाठी मोठा खर्च

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

मं.र.प्लू.9 वे. धार्मिक कार्यासाठी मोठा खर्च होईल. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. विपरीत घटनेतून लाभ होईल. मुत्सद्दीपणाने कामे होतील. विवाह जुळेल. नोकरी मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी, प्रवास, सभा-संमेलने इ.मुळे धावपळ होईल. घरगृहस्थीमधले मतभेद जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी संततीच्या समस्याकडे लक्ष द्या.

मिथुन : कानाचे विकार जाणवतील

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मं.र.प्लू. 8 वे. कानाचे विकार जाणवतील. जोखीम पत्करू नका. श्रम वाढतील. धंद्यात अडचणी, त्रास, मंदी जाणवेल. भाग्यकारक अनुभवसुद्धा येतील. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. प्रवास, परदेशगमन घडेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. एक-दोन गाठीभेटी, प्रवास इ.साठी धावपळ होईल. सप्ताहाच्या शेवटी घरगृहस्थीला प्राधान्य द्याल.

कर्क : भावनिक दडपण राहील

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

मं.र.प्लु. 7 वे. भावनिक दडपण राहील. शारीरिक व्याधी जाणवेल. परदेशगमनाची संधी मिळेल. कायदेशीर बाबीकडे लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक खर्च वाढेल. समस्या जाणवतील. सप्ताहाच्या सुरुवातीला. उत्साहाने कामे कराल. गोडधोड जेवणाचा लाभ होईल. कुटुंबासाठी खर्च होईल. कटुता जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी कामे होतील. प्रवास घडेल.

सिंह : कामात यश मिळत राहील

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

मं. र.प्लु. 6 वे. कामात यश मिळत राहील. संधी चालून येईल. विवाह जुळेल. आर्धिक प्राप्ती चांगली राहील; पण भावनिक दडपण राहील. अडचणी, त्रास, विलंब अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला आवश्यक खर्च वाढेल. कामाचा वेळ वाया जाईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल.

कन्या : मनाची कुचंबणा होईल

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

मं.र.प्लु. 5 वे. मनाची कुचंबणा होईल. संततीची उधळपट्टी चालू राहील; पण कुणाला दुखवू नका. भावनिक दडपण राहील. गैरसमज होतील. गुणवत्ता वाढवावी लागेल. जोडीदाराची मदत कामात होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक घटना घडतील. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. सप्ताहाच्या शेवटी रेेंगाळलेली कामे पूर्ण कराल.

तूळ : घरगृहस्थीची काळजी राहील

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

मं.र.प्लु.4 थे. घरगृहस्थीची काळजी राहील. पोटाची तक्रार जाणवेल. कला, क्रीडा, बौद्धिक क्षेत्रात प्रगती राहील. परदेशगमनाची संधी लाभेल. शत्रूवर मात करा. गुरुकृपा राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचे समाधान लाभेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी कामात अडचणी येतील. वेळ वाया जाईल.

वृश्चिक : कामात यश मिळेल

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

मं.र.प्लु.3 रे. कामात यश मिळेल. नवीन काम हाती घेऊ शकाल. सुवर्णालंकारांची प्राप्ती होईल. शेतीवाडी, पशुपालनात लक्ष घालाल. भावनिक दडपण राहील. प्रकृतीच्या तक्रारीकडे लक्ष द्या. सप्ताहाच्या सुरुवातीला वरिष्ठांची मर्जी सांभाळा. भाग्यकारक अनुभव येईल. एक-दोन दिवस कार्यसाफल्याचा आनंद मिळेल; पण दुर्लक्ष नको. शेवटी कामाचा मोबदला मिळेल.

धनु : आर्थिक प्राप्ती जेमतेम

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

मं.र.प्लु.2 रे. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. जामीन राहू नका. कौटुंबिक खर्च वाढेल. विपरीत घटनांतून लाभ संभवतो. कुटुंबाची काळजी कराल. उत्तरार्धात कर्माला भाग्याची जोड लाभेल. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्यावरील विश्वासामुळे मनाविरूद्ध कामे करावी लागतील. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. सप्ताहाच्या शेवटी विलंब, अडथळे पार करत कामाचे समाधान मिळवाल.

मकर: राग आवरा

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मं.र.प्लु.1 ले. राग येणारच; पण तोंडावर बोट ठेवा. भावनिक दडपण येईल. जोखमीची कामे काळजीपूर्वक करा. विसरभोळेपणामुळे नुकसान संभवते. भावंडांशी वाद टाळा. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला कामासाठी प्रवास घडेल. सहकार्य मिळवा. कामे होतील. एक-दोन दिवस सर्दी, पडसे जाणवेल. शेवटी वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

कुंभ : मोठे खर्च निघतील

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

मं.र.प्लु.12 वे. मोठे खर्च निघतील. आक्रमता टाळा. भावनिक दडपण येईल. जामीन राहू नका. अडचणी, विलंब, त्रास अनुभवाल; पण गुरुकृपा राहील. अभ्यासू वृत्ती राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला कष्टाच्या मानाने लाभ कमी होईल. एक-दोन दिवस यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल.

मीन : मोठे आर्थिक लाभ संभवतात

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मं.र.प्लु.11 वे. मोठे आर्थिक, प्रॉपर्टी इ.चे लाभ संभवतात. मोठ्या षड्यंत्रात भाग घेऊ नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. विपरीत घटनांतून लाभ संभवतो. विलंब, अडचणी, त्रास झाला, तरी निर्णायक कामात यश मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीसुख लाभेल. पुढे कामे होतील; पण मोबदला अपेक्षेपेक्षा कमी मिळेल. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news