Weekly Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचा आठवडा; यश मिळत जाईल, आर्थिक प्राप्ती होईल, पण मोठे खर्च निघणार

Weekly Horoscope in Marathi: साप्ताहिक राशिभविष्य २ ते ८ ऑगस्ट २०२६ जाणून घ्या तुमचा आठवडा कसा जाईल?
Weekly Horoscope
Weekly Horoscopefile photo
Published on
Updated on

Weekly Horoscope

हा सप्ताह वृषभ, कन्या, तूळ, कुंभ राशिगटाला उत्तम, तर मेष, सिंह, धनू राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश : दि. २-मंगळ मिथुनेत २२/५१, दि. ५- बुध कर्केत १९/४२.

महत्त्वाचे ग्रहयोग : दि. ७- रवी त्रिकोण शनी. वक्री ग्रह: शनी, नेपच्यून, प्लुटो. अस्तंगत ग्रह : गुरू.

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

रवी गुरू ४ थे. उच्च शिक्षणास अनुकूलता भासेल. क्रीडा क्षेत्रात पराक्रम गाजवाल. घरगृहस्थीचे मनावर दडपण राहील. कामा विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. निर्णायक कामात यश मिळेल. प्रलोभने टाळा. सप्ताहात आर्थिक प्राप्ती होईल. एक-दोन दिवस कंटाळवाणे जातील. रेंगाळलेल्या कामात यश मिळेल. शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

रवी गुरू ३ रे. नवीन कामे करण्याची धमक राहील. यश मिळत जाईल. विवाह जुळेल. कायमस्वरूपाची नोकरी शुभम मिळेल. कला क्षेत्रात आत्मविश्वास राहील. शत्रू निर्माण होतील. मुत्सद्दीपणाने वागा. सप्ताहात कामाचे समाधान मिळेल व आर्थिक मोबदला, बक्षिसे मिळतील. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. सप्ताहाच्या शेवटी कामात यश मिळेल.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

रवी गुरू २ रे. आर्थिक प्राप्ती चांगली; पण कष्टाने जेमतेम होईल. भांवडांशी वाद झाले, तरी समजूतदारपणा दाखवाल. मिथुन महत्त्वाकांक्षी राहाल; पण इतरांना दुखवू नका. विवाह जुळेल. जास्त जबाबदारीने कामे करावी लागतील. सप्ताहात वरिष्ठांचे दडपण राहील; पण कामात यश मिळवाल. आर्थिक मोबदला मिळेल. सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढेल. कामे बिघडतील. चिडचिड होईल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

रवी गुरू १ ले. पित्ताचा त्रास संभवतो. चटकन राग येईल; पण नवनवीन कल्पना सुचतील. भावनिक दडपण येईल. विवाह जुळेल. कायदा पाळा. शारीरिक व्याधी जाणवेल. सप्ताहाच्या सुरुवातीला थकवा दूर होईल; पण मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. कामात यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी अपेक्षेप्रमाणे धनलाभ होईल. मित्र भेटतील.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

रवी गुरू १२ वे. स्वभाव खर्चिक बनेल. मोठे खर्च निघतील. परदेशगमनाची संधी लाभेल. आर्थिक प्राप्ती होईल. प्रॉपर्टीची कामे होतील. विपरीत घटनेतून लाभसंभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल. चोरापासून सावध राहा. सहकार्याने कामे होतील व यश मिळेल. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

रवी गुरू ११ वे. मोठे आर्थिक लाभ होतील. समाजाभिमुख व्हाल. विवाह जुळेल. नोकरीत बदलीची शक्यता राहील. कामात यश मिळेल. मित्रामुळे अडचणीत याल. भावनिक दडपण राहील. सप्ताहात यश मिळेल; पण हितशत्रूमुळे लाभ कमी होतील. इतरांच्या सहकार्याने यश मिळत जाईल. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल वाढेल; पण मनावर वरिष्ठांचे दडपण राहील.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

रवी गुरू १० वे. कामे यशस्वी होतील. आर्थिक प्राप्ती होईल. नोकरी, धंदा यामध्ये उल्लेखनीय, चांगली घटना तुळ घडेल. भाग्यकारक अनुभव येतील. कामासाठी प्रवास घडेल. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. सप्ताहात कामे होतील; पण श्रेय कमी मिळेल. इतरांच्या सहकार्याने कामे होतील. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

रवी गुरू ९ वे. चांगले सल्लागार बनाल. परदेशगमनाची संधी लाभेल. थोडी फसवणूक होणे शक्य नाही. विवाह जुळल्यास श्रीमंत स्थळ मिळेल. भावनिक दडपण राहील. गुरुभेट होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबातील मतभेद जाणवतील. शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल. उत्तरार्धात कामात यश मिळेल. श्रेय कमी मिळेल. सहकार्याने कामे होती राहतील.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

रवी गुरू ८ वे. शारीरिक श्रम जाणवतील. धंद्यात मंदी जाणवेल. दुर्लक्ष झाल्यास नुकसान होईल. शेती, धनू बागायतीच्या कामात लक्ष होईल. भावनिक दडपण राहील. खर्च वाढेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल. घर-गृहस्थीमध्ये लक्ष घालाल. नेहमीच्या कामात शिथिलता येईल. संततीचा सहवास लाभेल. शेवटी कामात यश मिळेल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

रवी गुरू ७ वे. गुप्त कारवायांचा त्रास संभवतो; पण त्यातून मार्ग काढू शकाल. आर्थिक प्राप्ती होईल. विवाह जुळेल. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. ऐश्वर्यप्राप्तीचे एक प्रकारे आश्वासनच मिळेल. सप्ताहात सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागवाल. गाठीभेटी घ्या. प्रवास करा. कामात यश मिळेल. घरगृहस्थीकडे लक्ष द्याल. शेवटी संततीचा सहवास लाभेल.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

रवी गुरू ६ वे. कामात यश, चांगली संधी मिळेल. गोड बोलण्याने कामे होतील. हितशत्रूमुळे लाभ कमी होईल. खाण्यावर नियंत्रण ठेवा. कला, क्रीडा क्षेत्रात यश मिळेल; पण विलंब, त्रास अनुभवाल. सप्ताहाची सुरुवात उत्साहाने होईल. यश मिळेल. कौटुंबिक गरजा भागवाल. गाठीभेटी घ्या. प्रवास करा. शेवटी कामात शिथिलता येईल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

रवी गुरू ५ वे. सर्व बाबीत अनुकूलता असली, तरी मनाची कुचंबणा होईल. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. प्रॉपर्टीची कामे होतील. भावनिक दडपण येईल. परदेशगमनाची संधी लाभेल. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी, चिडचिडीने होईल. एक-दोन दिवसांत उत्साहाने कामे पूर्ण कराल. कौटुंबिक खर्च कराल. शेवटी घराबाहेरील कामे कराल. यश मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news