

Weekly Horoscope
हा सप्ताह मेष, कर्क, वृश्चिक, धनु राशिगटाला उत्तम, तर मिथुन, तूळ, कुंभ राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश ः दि. 2 ऑक्टो.-बुध तुळेत 27/43. महत्त्वाचे ग्रहयोग ः दि. 1 ऑक्टो.-बुध केेंद्र गुरू. वक्री ग्रह ः शनी, नेपच्यून, प्लुटो, हर्षल.
रवी 6 वा. कामात यश मिळत जाईल. भावनिक दडपण वाढेल. समस्या वाढतील. विवाह जुळेल. कलाक्षेत्रात चांगले काम होईल. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मानसन्मान लाभेल. आर्थिक मोबदला मिळेल.
रवी 5 वा. मनाची कुचंबणा होईल. शिक्षणाचे व घरगृहस्थीचे मनावर दडपण राहील; पण गुरुकृपा लाभेल. विवाह जुळेल. आर्थिक प्राप्ती होईल. कायमस्वरूपाची नोकरी लाभेल. विरोध कमी होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामाचे समाधान लाभेल. मुत्सद्दीपणा वापरा.
रवी 4 था. घरगृहस्थीचे दडपण राहील. नातेवाईक तुमचा वेळ घेतील. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. परदेशगमनाची संधी लाभेल. आत्मविश्वास वाढेल. संततीवर प्रेम राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे होतील. श्रेय कमी मिळेल. सहजीवन लाभेल. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी वरिष्ठांची मर्जी सांभाळा. प्रवास घडेल.
रवी 3 रा. विकासासाठी नवीन कामे हाती घ्याल. धनप्राप्ती होईल. पशुधन लाभेल. परदेशगमनाची संधी लाभेल. कामाच्या कायदेशीर बाबींकडे लक्ष द्या. शारीरिक व्याधी जाणवेल. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीसाठी वेळ द्या. मनोबल वाढेल. कामे होतील. श्रेम कमी मिळेल. सहजीवन लाभेल. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल.
रवी 2 रा. आर्थिक प्राप्ती जेमतेम होईल. जामीन राहू नका. भावंडांना मदत कराल. सुवर्णालंकारांची खरेदी कराल. गुरुकृपा राहील; पण कामात विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला थकवा जाणवेल. संततीच्या उधळपट्टीला आवर घाला. मनोबल वाढेल. कामात यश मिळेल. विसरभोळेपणा जाणवेल. सहजीवन लाभेल.
रवी 1ला. धंद्यात चैतन्य आणाल; पण स्वभाव खर्चिक व तापट होईल. आर्थिक प्राप्ती होईल. मनावर धंद्याचे दडपण राहील. घरातील सर्वांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. भावनावेग आवरा. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल. एक -दोन दिवस थकवा जाणवेल. संततीचा सहवास लाभेल. सप्ताहाच्या शेवटी आव्हानात्मक परिस्थितीत, कमी मोबदल्यात काम कराल.
रवी 12 वा. मोठे खर्च निघतील. नवीन कल्पना सुचतील; पण बोलून माणसांना दुखवू नका. सुरक्षितता बाळगा. महिलांना प्रसूतीसमयी त्रास होईल. गुरुकृपा राहील. अपेक्षेप्रमाणे लाभ होतील. सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबाच्या गरजा भागवा. गाठीभेटी, प्रवास इ. धावपळ करून यश मिळवाल. थकवा जाणवेल. घरगृहस्थी व संततीच्या अडचणी जाणून घ्या.
रवी 11 वा. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मित्रासाठी खर्च कराल. विपरीत घटनेतून लाभ होईल; पण धंद्याकडे दुर्लक्ष केल्यास नुकसानच होईल. भावनिक दडपण राहील. घरगृहस्थीत मतभेद आढळतील. सप्ताहाच्या सुरुवातीला मिष्टांनाचा लाभ होईल. कुटुंबाच्या गरजा भागवाल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास, धावपळीने यश मिळेल. शेवटी थकवा जाणवेल.
रवी 10 वा. कार्यक्षेत्र वाढेल. यश मिळेल. आई-वडिलांच्या दोघांच्या प्रकृतीची काळजी घ्या. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. पुरस्कारासाठी तुमचा विचार होऊ शकेल; पण विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. विवाह जुळेल. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. कुटुंबाच्या गरजा भागवाल. सप्ताहाच्या शेवटी कामात यश मिळेल.
रवी 9 वा. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. सामाजिक कार्यात सहभाग राहील. कामाच्या ठिकाणी प्रयत्न कमी पडतील. अधिकार असले, तरी सुरळीत चालणार नाहीत. खोटी कागदपत्रे करू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होतील. खर्च वाढेल. कामे रेंगाळली, तरी पुढील दोन दिवसांत ती पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कुटुंबाच्या गरजा भागवाल.
रवी 8 वा. धंद्यात मंदीचे वातावरण राहील. प्रशिक्षणासाठी निवड होईल. गुरुकृपा राहील. शिक्षणात आघाडी राहील. भावनिक दडपण राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचे समाधान लाभेल. आर्थिक प्राप्ती होईल. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे सप्ताहाच्या शेवटी पूर्ण करू शकाल.
रवी 7 वा. अहमपणा राहील. कामासाठी प्रवास घडेल. भावनिक दडपण राहील. कर्णविकार जाणवतील. भावंडांना त्रास संभवतो. निर्णायक कामात यश मिळत जाईल. सप्ताहाच्या सुरुवातीला वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मानसन्मान लाभेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढेल. कामे बिघडतील. चिडचिड होईल.