

Weekly Horoscope
हा सप्ताह मेष, कर्क, वृश्चिक, धनु राशिगटाला उत्तम, तर मिथुन, तूळ, कुंभ राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश ः दि. 17-रवी तुळेत 13/46, दि. 18-गुरू कर्केत 19/41. महत्त्वाचे ग्रहयोग ः दि. 14-शुक्र त्रिकोण हर्षल, शुक्र प्रतियुती नेपच्यून, शुक्र त्रिकोण प्लुटो, दि. 17-रवी केंद्र गुरू, वक्री ग्रह-शनी, हर्षल, नेपच्यून; प्लुटो दि. 13 पर्यंत.
रवी (17 प.) शुक्र 6 वे. कामात यश मिळत राहील. स्पर्धकांचा अंदाज घ्या. गुप्त कारस्थानाचा त्रास संभवतो. वाद टाळा. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. दि. 18 रोजी गुरू राशीला 4 था येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी घ्या. प्रवास करा. एक-दोन दिवस थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी संततीचा सहवास लाभेल.
रवी (17 प.) शुक्र 5 वे. कला, कॉम्प्युटर क्षेत्रात चांगले यश मिळेल. सर्व क्षेत्रांत प्रगती होत राहील. कायमस्वरूपाची नोकरी मिळेल. विरोध कमी होईल, तरी मनाची कुचंबणा होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबाच्या गरजा भागवाल. गाठीभेटी घ्या. प्रवास सुखकर होतील. कामात यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी थकवा जाणवेल. दि. 18 ला गुरू 3 रा येईल.
रवी (17 प.) शुक्र 4 थे. हाऊसकिपिंगकडे लक्ष द्याल. वृद्ध आई-वडिलांच्या तक्रारीकडे लक्ष द्या. परदेशगमनाची संधी लाभेल. विवाह जुळल्यास सुंदर स्थळ मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला उत्साहाने कामे उरकाल. गोडधोड जेवणाचा बेत कराल. कौटुंबिक गरजा भागवाल. सप्ताहाच्या शेवटी कामात यश मिळेल. धावपळ होईल. दि. 18 ला गुरू 2 रा येईल.
रवी (17 प.) शुक्र 3 रे. आर्थिक लाभासाठी खूप उलाढाली कराल. नवीन कामे करण्याची धमक राहील. कायदेशीर बाबीमुळे अडचणीत याल. भावंडांना कष्ट होतील. दि. 18 ला गुरू पहिला येईल. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी राहील. रेंगाळलेली कामे पुढील एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. गोडधोड कराल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल.
रवी (17 प.) शुक्र 2 रे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल; पण प्रामाणिकपणे जेमतेम होईल. सुवर्णालंकारांची प्राप्ती होईल. विवाह जुळेल. कामात विलंब, अडचणी त्रास होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभाच्या घटना घडतील. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. सप्ताहाच्या शेवटी कामे उत्साहाने कराल. चांगले जेवण लाभेल. दि. 18 ला गुरू 12 वा येईल.
रवी (17 प.) शुक्र 1 ले. पित्ताचा त्रास संभवतो. स्वत:साठी बराच खर्च करावा लागतो. आनंदी राहाल. कुटुंबात मनमानी कराल. भावनिक दडपण येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मानसन्मान लाभेल. आर्थिक मोबदला मिळेल. सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढेल. चिडचिड होईल. कामे बिघडतील. दि. 18 ला गुरू 11 वा उत्तम येईल.
रवी (17 प.) शुक्र 12 वे. आर्थिक प्राप्तीपेक्षा खर्चाचे विषय जास्त राहतील. बोलताना जिभेवर ताबा ठेवा. मनमानी कराल. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. दि. 18 ला गुरू राशीला 10 वा येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला गुरुकृपा लाभेल. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मानसन्मान लाभेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक लाभाच्या घटना घडतील.
रवी (17 प.) शुक्र 11 वे. मोठे आर्थिक लाभ होतील. मनोरंजनाकडे कल राहील. अनावश्यक खर्च होईल. भावनिक दडपण राहील. घरगृहस्थीत मतभेद राहतील. दि. 18 रोजी गुरू 9 वा सर्वोत्तम असा येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कार्यक्षेत्राला कलात्मकतेची जोड द्याल. बढतीची शक्यता राहील.
रवी 10 वा. कार्यक्षेत्र वाढेल. यश मिळेल. आई-वडिलांच्या दोघांच्या प्रकृतीची काळजी घ्या. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. पुरस्कारासाठी तुमचा विचार होऊ शकेल; पण विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. विवाह जुळेल. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. कुटुंबाच्या गरजा भागवाल. सप्ताहाच्या शेवटी कामात यश मिळेल.
रवी 9 वा. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. सामाजिक कार्यात सहभाग राहील. कामाच्या ठिकाणी प्रयत्न कमी पडतील. अधिकार असले, तरी सुरळीत चालणार नाहीत. खोटी कागदपत्रे करू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होतील. खर्च वाढेल. कामे रेंगाळली, तरी पुढील दोन दिवसांत ती पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कुटुंबाच्या गरजा भागवाल.
रवी 8 वा. धंद्यात मंदीचे वातावरण राहील. प्रशिक्षणासाठी निवड होईल. गुरुकृपा राहील. शिक्षणात आघाडी राहील. भावनिक दडपण राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचे समाधान लाभेल. आर्थिक प्राप्ती होईल. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे सप्ताहाच्या शेवटी पूर्ण करू शकाल.
रवी 7 वा. अहमपणा राहील. कामासाठी प्रवास घडेल. भावनिक दडपण राहील. कर्णविकार जाणवतील. भावंडांना त्रास संभवतो. निर्णायक कामात यश मिळत जाईल. सप्ताहाच्या सुरुवातीला वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मानसन्मान लाभेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढेल. कामे बिघडतील. चिडचिड होईल.