Vish Yog 2026: सावधान! शनिदेव अन् चंद्राच्या युतीचा 'विष योग', या राशीच्या लोकांची 'कमाई' करणार कमी

Vish Yog 2026
Vish Yog 2026pudhari
Published on
Updated on

Vish Yog 2026: ज्योतिष शास्त्रानुसार ज्यावेळी एखाद्याच्या कुंडलीत शनि आणि चंद्र एकाचवेळी येतात त्यावेळी त्याला विष योग असं म्हटलं जातं. या योगामुळं मानसिक ताण, अस्थिरता आणि जीवनात चढ उतार होण्याचे संकेत मिळतात. द्रिक पंचांगानुसार १२ मे रोजी सायंकाळी चंद्र कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे.

त्याच्या आधी मीन राशीत आधीपासून उपस्थित असलेल्या शनिसोबत चंद्र युती करेल. यामुळं विष योग सक्रीय होणार आहे. या काळात काही राशींना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या काळात तनाव, मानसिक दबाव आणि आरोग्याच्या संबंधी समस्या वाढण्याची शक्यता आहे. हा अशुभ योगचा प्रभाव १४ मे नंतरही पहावयास मिळू शकतो.

Vish Yog 2026
Shani Nakshatra Parivartan 2026 : शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे या ३ राशींनी राहावे सावध, मे २०२६ पर्यंत आव्हानांचा काळ

कर्क राशी

कर्क राशीचा स्वामी चंद्र असतो. त्यातच त्याची युती शनीशी झाल्यामुळं ही युती तुमच्या आयुष्यात थोडा तणाव वाढवू शकते. या काळात मानसिक अस्वस्थता आणि चिंता वाढू शकते. काही लोकांना खोकला - सर्दी या सारख्या आरोग्याच्या छोट्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात कष्टावर विश्वास ठेवा आणि नशिबावर विश्वास ठेवून कामे करू नका.

उपाय - भगवान शिवाची पूजा करा यामुळे थोडा दिलासा मिळू शकतो.

Vish Yog 2026
Shukra Gochar 2026 | शुक्राचे राशीपरिवर्तन, वृषभ राशीतील प्रवेशामुळे 'या' राशींचे नशीब चमकणार!

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना या काळात खास काळजी घ्यावी लागणार आहे. वाहन चालवत असताना सतर्क रहा. धोका पत्करू नका. जुने आजार पुन्हा त्रास देऊ शकतात. आर्थिक बाबींमध्ये देखील काळजी घ्या. अनावश्यक खर्चापासून सावध रहा विचार करून निर्णय घ्या.

उपाय - गरजूंना मदत करा आणि सेवाभाव ठेवा

Vish Yog 2026
Gajalakshmi Rajyog 2026: 'गजलक्ष्मी राजयोग' जुळून येणार! 'या' ५ राशींना विवाह, नोकरी आणि धनलाभाचे प्रबळ योग

तुळ राशी

तुळ राशीच्या लोकांना या काळात प्रचंड आळस येण्याची शक्यता आहे. यामुळं कामात दिरंगाई होऊ शकते. घसा किंवा पोटाच्या आरोग्याबाबत समस्या उद्धवू शकते. कौटुंबीक जीवनात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होईल अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका, संयमानं अन् धैऱ्याने काम करणं गरजेचं आहे.

उपाय - विष योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी पार्वती देवीची पूजा करा.

Vish Yog 2026
Shukra Gochar 2026 | शुक्राचे राशीपरिवर्तन, वृषभ राशीतील प्रवेशामुळे 'या' राशींचे नशीब चमकणार!

मीन राशी

मीन राशीच्या लोकांसाठी देखील हा विष योग तयार होत आहे. त्यामुळं या राशीच्या लोकांनी सर्वांपासून सावध राहण्याची गरज आहे. थकवा, सांधे दुखी किंवा झोपेची कमतरता यामुळं समस्या होऊ शकतात. घरात किंवा कुटुंबात वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. या काळात शांत राहणं गरजेचं.

उपाय - शिवलिंगाला जल अर्पित करा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news